AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच! मुंबईत सामने होणार की नाहीत? मोठी अपडेट समोर

Icc Mens T20i World Cup 2026 Semi and Final Venue and Schedule : वनडेनंतर आता 3 वर्षांनी पुन्हा एकदा भारतात वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान भारतातील अनेक शहरात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

T20i World Cup 2026 फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच! मुंबईत सामने होणार की नाहीत? मोठी अपडेट समोर
Icc T20i World Cup 2026 Narendra Modi StadiumImage Credit source: Tv9 Bharatvarsh And AFP/PTI
| Updated on: Nov 09, 2025 | 9:09 PM
Share

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेनंतर आता काही महिन्यांनी मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धेचं वेळापत्रक येत्या काही दिवसात जाहीर होणार असल्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आली होती. तसेच बीसीसीआय-आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीत भारतातील 5 आणि श्रीलंकेतील 3 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर आता या स्पर्धेला केव्हा सुरुवात होणार? तसेच उपांत्य फेरीतील 2 आणि अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर मुंबईत सेमी फायनलमधील 1 सामना होणार आहे. तसेच स्पर्धेचं आयोजन हे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

..तर भारत-पाकिस्तान सामना कोलंबोत!

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात पहलगाम हल्ल्यानंतर संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतही एकमेकांविरुद्ध एकमेकांच्या घरच्या मैदानात खेळत नाहीत. दोन्ही संघांचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतात. त्यामुळे पाकिस्तान आणि टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचले तर सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

इंडियन एक्सप्रेसनुसार, भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचल्यास तो सामना कोलंबोत होईल. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

टी 20i वर्ल्ड कप 2026 बाबत महत्त्वाच्या अपडेट्स

तसेच भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. या 5 शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि, चेन्नईचा समावेश आहे. तर श्रीलंकेत कोणत्या शहरात सामने होणार? हे निश्चित नाही.

टीम इंडिया गतविजेता

दरम्यान टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारतीय संघाने 2024 साली अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा थरारक झालेल्या सामन्यात धुव्वा उडवला आणि वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.