AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर 3 विकेट्सने मात, महिला ब्रिगेडचा विजयरथ रोखला

India Women vs South Africa Women Match Result : रिचा घोष हीने केलेल्या 94 धावांच्या मदतीने भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 252 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर 3 विकेट्सने मात, महिला ब्रिगेडचा विजयरथ रोखला
India Women vs South Africa Women Match ResultImage Credit source: Icc X account
| Updated on: Oct 10, 2025 | 12:23 AM
Share

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने यजमान टीम इंडियाचा विजयरथ रोखत या मोहिमेतील दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 7 बॉलआधी आणि 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 48.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात 252 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह सलग दुसरा विजय मिळवला. तसेच दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला सलग तिसरा विजय मिळवण्यापासून रोखलं.

दक्षिण आफ्रिकेची विजयी हॅटट्रिक

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सामन्यात एक वेळ पराभवाच्या छायेत होती. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाकडून विजय हिसकावला. दक्षिण आफ्रिकेची 5 आऊट 81 अशी स्थिती झाली होती. मात्र नडीन डीक्लर्क हीने 54 बॉलमध्ये नॉट 84 रन्सची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेने यासह टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध सलग तिसरा विजय साकारला.

दक्षिण आफ्रिकेचं कमबॅक

कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्टने ट्रायॉनसह 5 आऊट 81 नंतर दक्षिण आफ्रिकेला सावरलं. दोघींनी दक्षिण आफ्रिकेला ट्रॅकवर आणलं. त्यानंतर या जोडीने टीम इंडियाला बॅकफुटवर टाकायला सुरुवात केली. ही जोडी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा क्रांती गौड हीने ही सेट जोडी फोडली. क्रांतीने कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्टला बोल्ड करत 71 रन्सची पार्टनरशीप ब्रेक केली.

डीक्लर्क विजयाचा घास हिसकावला

दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिल्यानंतर टीम इंडिया सामन्यावर घट्ट पकड मिळवेल, असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. नडीन डीक्लर्क हीने मैदानात येताच फटकेबाजी सुरु केली. नडीनने ट्रायॉनसह 69 धावा जोडल्या. नडीनने 47 व्या ओव्हरमध्ये क्रांतीच्या बॉलिंगवर सलग 2 सिक्स लगावले. नडीनने यासह 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि सामन्यावर पकड मिळवली.

डीक्लर्क त्यानंतर भारतीय गोलंदाजांवर तुटून पडली. डीक्लर्कने 49 व्या ओव्हरमध्ये सलग 2 सिक्स लगावले आणि दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. डीक्लर्कने 54 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 84 रन्स केल्या.

पहिल्या डावात काय झालं?

टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीने 55 धावांची भागीदारी केली. मात्र स्मृती सलग तिसऱ्यांदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. हरलीन देओल ही देखील आऊट झाली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाहने पुन्हा निराशा केली. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 83-1 वरुन 6 आऊट 102 अशी झाली.

सहावी विकेट गमावल्यानंतर ऋचा घोष मैदानात आली. ऋचा आणि अमनजोत कौर या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर ऋचाने स्नेह राणासह 53 बॉलमध्ये 88 धावा जोडल्या. स्नेहने 24 बॉलमध्ये 33 रन्सची निर्णायक खेळी केली. तर ऋचाने 77 बॉलमध्ये 94 रन्स केल्या. तर दक्षिण आफ्रिकेसाठी क्लोए ट्रायॉनने 3 विकेट्स घेतल्या.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.