AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : 4 सिक्स-11 फोर, ऋचा घोषची तोडफोड खेळी, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Richa Ghosh World Record : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला झटपट झटके देत बॅकफुटवर टाकलं होतं. त्यामुळे भारताच्या 150 धावा होतील की नाही? अशी स्थिती होती. मात्र रिचा घोषने वादळी खेळी करत भारताची लाज राखली आणि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

IND vs SA : 4 सिक्स-11 फोर, ऋचा घोषची तोडफोड खेळी, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Richa Ghosh World RecordImage Credit source: Getty Images
| Updated on: Oct 09, 2025 | 9:27 PM
Share

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाची विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. ऋचाने टीम इंडिया अडचणीत असताना सुरुवातीला संयमी खेळी केली. त्यानतंर ऋचाने परिस्थितीनुसार गिअर बदलत फटकेबाजी केली. ऋचा चौकार-षटकारांच्या मदतीने शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली होती. मात्र ऋचाचं शतक अवघ्या 6 धावांनी अधुर रांहिलं. ऋचा 94 धावांवर आऊट झाली. ऋचाचं शतक होऊ शकलं नाही. मात्र ऋचाने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमधील तिन्ही फलंदांजांनी चांगल्या सुरुवातीनंतरही निराशा केली. मिडल ऑर्डरमधील फलंदाज सलग तिसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकेने झटपट 6 झटके दिले. त्यानतंर आठव्या स्थानी आलेल्या ऋचाने गेम फिरवला. ऋचाने अमनज्योत कौर आणि स्नेह राणा यांच्यासह सातव्या आणि आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

ऋचाने आठव्या विकेटसाठी अमनजोतसह 51 रन्सची पार्टनरशीप केली. ऋचाने या दरम्यान कारकीर्दीतील सातवं आणि वनडे वर्ल्ड कपमधील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. ऋचाने 53 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अमनजोत आऊट झाल्यानंतर स्नेहसह ऋचाने 88 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्नेह राणाही आऊट झाली. भारताने अशाप्रकारे आठवी विकेट गमावली.

ऋचाचा वर्ल्ड रेकॉर्ड

त्यानंतर ऋचा घोष हीने फटकेबाजी करुन भारताचा स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तिचं शतक हुकलं. ऋचाने 94 धावा केल्या. ऋचाचं शतक 6 धावांनी हुकलं मात्र तिने या खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली.

ऋचा आठव्या स्थानी येऊन 94 धावा करणारी पहिली महिला फलंदाज ठरली. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या क्लोए ट्रायॉन यांच्या नावावर होता. क्लोएने श्रीलंकेविरुद्ध 74 धावा केल्या होत्या. तसेच भारतासाठी विकेटकीपर म्हणून ऋचाची सर्वोच्च खेळी ठरली. ऋचाने याबाबतीत 33 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. फौजिया खलीली यांनी 1982 साली इंग्लंड विरुद्ध 88 धावांची खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेसमोर 252 रन्सचं टार्गेट

दरम्यान ऋचा घोष व्यतिरिक्त टीम इंडियासाठी प्रतिका रावल आणि स्नेह राणा या दोघींनी 30 पेक्षा अधिक धावा केल्या. प्रतिकाने 37 धावांचं योगदान दिलं. तर स्नेहने 24 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. तर स्मृती मंधानाने 23 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 पार मजल मारता आली नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...