AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी……, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. (tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी......, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!
टीम साऊथी आणि विराट कोहली
| Updated on: May 22, 2021 | 7:11 AM
Share

मुंबईवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करुन कसोटीतीलही वर्ल्ड कप जिंकायची नामी संधी आहे. हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू उत्सुक आहेत. पण फायनलअगोदरच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी माइंड गेम सुरु केला आहे.  भारताला अंतिम सामन्यात हरविण्यासाठी आम्हाला इंग्लंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी  मालिका, हा मोठा मंच असेल. फायनलची तयारी आमची इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये होईल. जेणेकरुन अंतिम सामन्यात आम्ही भारताविरुद्ध चांगलं प्रदर्शन करु, असं म्हणत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने (Tim Southee) टीम इंडियाला डिवचलं आहे. (ICC World Test Championship New Zealand Pacer tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

WTC फायनलअगोदर न्यूझीलंड इंग्लंड भिडणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलअगोदर न्यूझीलंड आणि इंग्लंडचा संघ भिडणार आहे. न्यूझीलंडला इंग्लंडविरोधात दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला कसोटी सामना लॉर्ड्स इथे 2 जून ते 6 जून रोजी खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना 10 ते 14 जूनदरम्यान खेळवला जाईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 18 जूनला खेळविण्यात येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड आमने सामने असतील.

फायनलअगोदर आम्हाला मोठी संधी

इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत पण न्यूझीलंडच्या खेळाडूंचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर जास्त लक्ष आहे का? असा सवाल टीम साऊथीला करण्यात आला. यावेळी तो म्हणाला, “जेव्हाही न्यूझीलंडकडून तुम्हाला कसोटी सामने खेळण्याची संधी मिळते, तेव्हा एक वेगळाच आनंद असतो. तेव्हा सराव म्हणून कुणी खेळत नाही. सगळे जीव लावून मॅच खेळत असतात. आता फायनलअगोदर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामने आहेत. त्याच्यावर आमचं फोकस आहे. फायनलअगोदर आम्हाला मोठी संधी आहे.”

भारताला मात देण्यासाठी….

कसोटी क्रिकेटमध्ये 302 विकेट्स घेणाऱ्या 32 वर्षीय साऊथीने सांगितलं, “भारताविरुद्धच्या मोठ्या मॅचची तयारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांतून होईल. फायनलअगोदर आमच्यासाठी ही मोठी संधी असेल. फायनलमध्ये भारताला मात द्यायची असेल तर आम्हाला इंग्लंडविरोधात चांगलं प्रदर्शन करावं लागेल, म्हणूनच सध्या तरी आमचं लक्ष इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यांवर आहे”.

टीम साऊथीचा विराटला इशारा

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. तत्पूर्वी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम साऊथीसह अन्य खेळाडूंबरोबर त्यांचे चाहते विमानतळावर फोटो घेत होते.

याचदरम्यान साऊथीच्या एका फॅन्सने विराटची विकेट घेऊ इच्छितोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ‘तसं झालं मला आनंद होईल’ असं सांगत विराटची विकेट घेण्यास तो किती आसुससा आहे, असंच साऊथीने सुचवलं. दुसरीकडे या माध्यमातून साऊथीने थेट विराटला डिवचल्याची चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये आहे.

(ICC World Test Championship New Zealand Pacer tim Southee India vs New Zealand WTC Final 2021)

हे ही वाचा :

Photo : हार्दिक पांड्याची 27 व्या वर्षी उंच भरारी, गुजरातमध्ये आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!

जाडेजा-हार्दिकमुळे माझी आणि कुलदीप यादवची जोडी फुटली : युजवेंद्र चहल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.