DC vs SRH : सुपरफास्ट! दिल्लीच्या नॉर्खियाची आणखी एक भेदक डिलेव्हरी, टाकला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

दिल्ली आणि हैद्राबाद यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक गोलंदाजी करत हैद्राबादला केवळ 134 धावांवर रोखलं. यावेळी त्यांचा गोलंदाज एन्रीच नॉर्खियाने अप्रतिम गोलंदाजी केली.

DC vs SRH : सुपरफास्ट! दिल्लीच्या नॉर्खियाची आणखी एक भेदक डिलेव्हरी, टाकला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू
एन्रीच नॉर्खिया

दुबई: दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्खिया (Anrich Nortje) याने दुबईच्या मैदानात आणखी एक कारनामा करुन दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असणाऱ्या नॉर्खियाने आय़पीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम केला आहे. आता सनरायजर्स हैद्राबाद (SRH) संघाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातीलही वेगवान चेंडू फेकला आहे. नॉर्खियाने तब्बल 151.7 इतक्या वेगाचा चेंडू टाकत फलंदाजालाही हैराण करुन सोडलं.

नॉर्खियाने याआधीही अशी कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. आयपीएलच्या 2020 च्या सीझनमध्ये 156.22 इतक्या वेगानं चेंडू टाकत नॉर्खियाने विक्रम केला होता. त्यानंतर आता यंदाच्या हंगामातीलही वेगवान चेंडू त्यानेच टाकला आहे. यानंतर त्याचा हा विक्रम कोणता गोलंदाज किंवा स्वत: तो तोडतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वात वेगवान 6 डिलेव्हरीज नॉर्खियाच्याच नावावर आहेत.

हैद्राबादची सुमार फलंदाजी

सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला हैद्राबादचा निर्णय साफ चुकिचा ठरला. संघातील एकाही खेळाडूला 30 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. संघाकडून सर्वाधिक धावा या युवा खेळाडू अब्दुल समाद याने केल्या असून त्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याशिवाय राशिदने 22 धावा केल्या. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील बेस्ट फलंदाज केन विल्यमसनही आज केवळ 18 धावाच करु शकल्याने हैद्राबाद केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला.

दिल्लीची ‘वेगवान’ गोलंदाजी

दिल्लीच्या संघाने हैद्राबादला 134 धावाच करु दिल्या. यामध्ये संघाच्या वेगवान गोलंदाजानी महत्त्वाची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज नॉर्खिया आणि रबाडा यांनी भेदक गोलंदाजी करत अनुक्रमे 2 आणि 3 विकेट्स घेतले. यामध्ये नॉर्खियाने अतिशय वेगवान आणि अप्रतिम चेंडू टाकत 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा दिल्या. याशिवाय अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या असून 2 फलंदाज धावचीत झाले.

हे ही वाचा

‘न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात’, पाकिस्तान म्हणतंय महाराष्ट्रातून पाठवण्यात आला धमकीचा ई-मेल!

IPL 2021: भारताचा ख्रिस गेल, ज्याला आज्जीनं कपडे धुवायच्या धोपटण्यानं क्रिकेटर बनवलं, गाजवतोय आयपीएल

RR vs PBKS: पंजाबला नमवल्यानंतर राजस्थानचा कार्तिक शर्ट काढून नाचला, ड्रेसिंग रुममध्ये आनंदोत्सव, पाहा VIDEO

(In DC vs SRH match Delhi capitals anrich nortje Bowled Fastest delivery in IPL 2021)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI