AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाज

एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. या स्पर्धेत भारताने 2013 पहिल्यांदा जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यंदाही तसंच झालं. जेतेपदाचं स्वप्न तगडी स्टारकास्ट असूनही भंगलं.

IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाज
IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाजImage Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Nov 21, 2025 | 8:29 PM
Share

रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 स्पर्धेत इंडिया ए संघाचं पारडं जड होतं. टीम इंडियात तगडे स्टार खेळाडू असल्याने जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटलं. पण साखळी फेरीत पाकिस्तानकडून आणि उपांत्य फेरीत बांगलादेशकडून पराभूत होऊन मायदेशी परतावं लागणार आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली पण अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद मिळण्याचं स्वप्न मात्र भंगलं. खरं तर उपांत्य फेरीत सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. तसेच विजयासाठी दिलेल्या 195 धावा सहज गाठेल अशी सुरुवातही झाली. पण 20 भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावांची बरोबरी गाठू शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये आयपीएलमध्ये स्टार फलंदाज फेल गेले. दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या आणि हाती फक्त भोपळा आला. त्यामुळे पराभव होणार हे निश्चित झालं. त्यातही वाइड टाकला आणि सामना संपला. या पराभवासाठी पाच खेळाडू जबाबदार आहेत. कसं ते समजून घ्या

जितेश शर्मा : उपांत्य फेरीतील पराभवासाठी कर्णधार स्वत: जबाबदार आहे. त्याने महत्त्वाच्या सामन्यात 23 चेंडूत 33 धावा केल्या. पण अशावेळी बाद होऊन परतला जेव्हा त्याची मैदानात गरज होती. सुपर ओव्हरमध्येही खराब खेळला आणि पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला.

नमन धीर : फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही ठिकाणी फ्लॉप ठरला. 12 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. तर गोलंदाजीत एकाच षटकात 28 धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी अतिरिक्त धावांचा बोजा पडला. झालंही तसंच एका धावेने पराभव निश्चित झाला.

विजयकुमार विशक : उपांत्य फेरीत बांगलादेशी फलंदाजांना तर विजयकुमार विशकची गोलंदाजी बोनस म्हणूनच मिळाली. विकेट तर दिली नाही. चार षटकात 51 धावा ठोकल्या. हा स्पेल भारताच्या पराभवाचं कारण ठरलं.

आशुतोष शर्मा : आयपीएलमध्ये आशुतोष शर्मा काही सामन्यात फिनिशरची भूमिका बजावताना दिसला आहे. पण उपांत्य फेरीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 6 चेंडूत फक्त 13 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये पहिली विकेट पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट टाकून आला.

रमणदीप सिंग : आयपीएल स्टार या खेळाडूनेही निराशा केली. उपांत्य फेरीत 11 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. इतकंच काय तर गोलंदाजीत 2 षटकं टाकली आणि 29 धावा दिल्या.

नेहल वढेरा: आयपीएलमध्ये नेहल वढेराचा भाव आहे. लिलावात हे दिसून आलं आहे. पण उपांत्य फेरीत संथ गतीने खेळणं टीम इंडियाला महागात पडलं. त्याने 29 चेंडूंचा सामना करत फक्त 32 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट फक्त 110 चा होता.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल