AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये ठरले ‘शून्य’, जितेश शर्मा म्हणाला..

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत टीम इंडिया ए संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 194 धावा बरोबरीत सोडवल्या. पण सुपर ओव्हरमध्ये आयपीएल स्टार्संनी फ्लॉप शो केल्या. त्यामुळे अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं.

आयपीएल रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये ठरले 'शून्य', जितेश शर्मा म्हणाला..
आयपीएल रायझिंग स्टार्सचा आशिया कप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये ठरले 'शून्य', जितेश शर्मा म्हणाला..Image Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Nov 21, 2025 | 7:46 PM
Share

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंडिया ए आणि बांग्लादेश ए संघात पार पडला. या सामन्यात सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने होतं. पण विजय काही मिळवता आला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना भारताला शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. पण भारताने तीन धावा काढल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. भारताच्या आयपीएल सुपर स्टार्सकडून सुपर ओव्हरमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण बांगलादेशी गोलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये भारताची हवा काढली. पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट काढल्या आणि भारताचा खेळ संपवला. त्यामुळे विजयासाठी फक्त 1 धाव मिळाली. त्यात पण वाइड टाकला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

उपांत्य फेरीत बांगलादेशच्या हबीबूर रहमान सोहनची 65 आणि एसएम मेहेरोबच्या नाबाद 48 धावांची खेळी महागात पडली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. विजयकुमार विसकने सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात एकही गडी बाद न करता 51 धावा दिल्या. तर गुरजपनीत सिंगने 2 विकेट घेतल्या पण 39 धावा दिल्या. रमणदीप सिंगने 2 षटकात 1 विकेट घेत 29, नमन धीरने 2 षटकात 33 धावा देत 1 विकेट घेतला. हर्ष दुबेने चांगला स्पेल टाकला. 4 षटकात 1 गडी बाद करत 22 धावा दिल्या. विजयी धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत 38 धावा केल्या. तर प्रियांश आर्यने 44, जितेश शर्माने 33, नेहल वढेराने 32 धावा केल्या.

पराभवानंतर कर्णधार जितेश शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. जितेश शर्मा म्हणाला की, ‘मी सर्व जबाबदारी घेईन, एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मला खेळ संपवायचा आहे. हा शिकण्याबद्दल आहे, पराभवाबद्दल नाही. तुम्हाला कधीच माहिती नाही, हे खेळाडू कधीतरी भारतासाठी विश्वचषक जिंकू शकतात. प्रतिभेच्या बाबतीत ते आकाशाला स्पर्श करत आहेत. हे सर्व शिकण्याबद्दल आणि अनुभवाबद्दल आहे. माझी विकेट हा टर्निंग पॉइंट होता. मला या परिस्थिती कशा हाताळायच्या हे माहित आहे. त्यांनी खरोखर चांगली गोलंदाजी केली. त्याने 19वे षटक टाकले, त्याचे श्रेय त्याला जाते. सर्व 20 षटक आम्ही नियंत्रणात होतो, कोणालाही दोष देऊ नका. हा एक चांगला खेळ आहे. ‘

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.