IND vs AUS | टीम इंडियाचा पहिल्या विजयासह ऐतिहासिक कारनामा

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. या विजयात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं. या विजयासह टीम इंडियाने मोठा कारनामा केलाय.

IND vs AUS | टीम इंडियाचा पहिल्या विजयासह ऐतिहासिक कारनामा
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 11:59 PM

मुंबई | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आधी कांगारुंना स्वसतात गुंडाळंल. त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या जोडीने ऑस्ट्रेलियाला झोडलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच टीम इंडियाने या विजयासह मोठा कारनामा केला आहे. तब्बल 15 वर्षानंतर टीम इंडियाने ही कामगिरी केली आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडिया 189 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. मात्र कांगारुंनी दणादणा धक्के दिले. इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल झटपट आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 39 अशी नाजूक स्थिती झाली. यानंतर केएल राहुल याच्या सोबतीने कॅप्टन हार्दिकने पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. यानंतर हार्दिक 25 धावांवर बाद झाला. यामुळे टीम इंडियाचा स्कोअर आता 5 बाद 83 असा झाला होता. एका बाजूला विकेट जात होते. तर दुसऱ्या बाजूला केएल एकाकी खिंड लढवत होता.

हार्दिकनंतर रविंद्र जडेजा मैदानात आला. जडेजासोबत केएलने संयमी सुरुवात केली. स्कोअरकार्ड हलता ठेवला, एक एक धाव जोडली. टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दरम्यान त्याने अर्धशतक ठोकलं. अर्धशतक ठोकल्यानंतर केएलने काही फटके मारले. केएलने गिअर चेंज करत फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने जडेजाही चांगली साथ देत होता. या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. रविंद्र जडेजा याने 45 तर केएलने 75 धावांची खेळी केली.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन हार्दिकचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. टीम इंडियाने कांगारुंना झटपट गुंडाळलं. ऑस्ट्रेलिया 188 धावांवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा याने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर कुलदीप यादव आणि हार्दिकने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वानखेडेत 15 वर्षांनी विजय

टीम इंडियाचा हा वानखेडेतील स्टेडियममधील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 12 वर्षानंतर विजय ठरला. उभय संघात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळवण्यात आलेत. या 5 पैकी टीम इंडियाचा हा दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा अखेरचा वनडे विजय हा 17 ऑक्टोबर 2007 रोजी मिळवला होता. तेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2 विकेट्सने विजय मिळवला होता.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.