AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची 5 विकेट्स घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….

रवींद्र जडेजा याने ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून कमबॅक केलं. जडेजाने दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाच्या खुर्दा उडवला. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाची 5 विकेट्स घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....
| Updated on: Feb 09, 2023 | 8:15 PM
Share

नागपूर : नागपूर कसोटीतील पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 1 विकेट गमावून 77 धावा केल्या. टीम इंडिया अजून 100 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांवर ऑलआऊट केलं. कांगारुंनी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने शानदार कमबॅक केलं. जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना आऊट केलं. जडेजाच्या या कामगिरीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. या कामगिरीनंतर जडेजाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्य्या यशाचं रहस्य उलगडलं.

जडेजा काय म्हणाला?

“रिदम असल्याने बॉलिंग करताना उत्सुकता होती. मी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सराव करत होतो. हातातून बॉल अपेक्षितरित्या टाकला जात होता. लाईन आणि लेंथही बरोबर होतं. विकेटमध्ये बाऊन्स नसल्याने मी स्टंप टु स्टंप बॉल टाकत होतो, जेणेकरुन एलबीडब्ल्यू आणि बोल्ड होण्याची संधी निर्माण होऊ शकते. सुदैवाने एलबीडबल्यू आणि बोल्ड विकेट मिळाले. त्यामुळे मी आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया जडेजाने दिली.

जडेजाने एकूण 22 ओव्हर टाकल्या. या 22 ओव्हरमध्ये त्याने 8 षटकं ही निर्धाव टाकली. तर 47 रन्स देत 5 महत्तवपूर्ण विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे जडेजाला हॅटट्रिक घेण्याचीही संधी होती.

जडेजाने मार्नल लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी या पाच जणांचा काटा काढला. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 रन्सचं योगदान दिलं. विकेटकीपर एलेक्स कॅरीने 36 रन्स केल्या. तर पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा जोडल्या.

टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचा 177 धावांवर खुर्दा उडाला. त्यानंतर टीम इंडियाच्या केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा या सलामी जोडीने शानदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर केएल आऊट होऊन माघारी परतला. त्यानंतर काही षटकांनंतर पहिल्या दिवसांचा खेळ संपला.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.