41 षटकांमध्ये एकही विकेट न घेणारा ‘हा’ गोलंदाज ब्रिस्बेन कसोटीचा निकाल बदलणार; स्टिव्ह स्मिथला विश्वास

41 षटकांमध्ये एकही विकेट न घेणारा 'हा' गोलंदाज ब्रिस्बेन कसोटीचा निकाल बदलणार; स्टिव्ह स्मिथला विश्वास

ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येत असलेला चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी दुसऱ्या डावात 328 धावांचे आव्हान दिले आहे

अक्षय चोरगे

|

Jan 19, 2021 | 12:04 AM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) चौथ्या दिवसाचा खेळ नुकताच संपला आहे. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात झाल्यापासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघावर वर्चस्व गाजवलं. जोश हेजलवूड, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नेथन लायन या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं होतं. परंतु एका बाजूला कांगारु कसलेली गोलंदाजी करत असताना त्यांचा एक गोलंदाज मात्र अपयशी ठरला आहे. या गोलंदाजाने आज एक लाजिरवाणा विक्रम स्वतःच्या नावे केला. ( Ind vs Aus: Steve Smith Believes Cameron Green Can Be Handful on Final day)

त्या गोलंदाजांचं नाव जाणून घेण्यापूर्वी तो लाजिरवाणा विक्रम काय आहे ते आधी समजून घ्या. हा विक्रम विकेट्सच्या दुष्काळाचा आहे. एखाद्या कसोटी सामन्यात जास्तीत जास्त चेंडू गोलंदाजी करुनही विकेट न मिळाल्याचा हा रेकॉर्ड आहे. 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली हा रेकॉर्ड मध्यमगती गोलंदाज मिचेल मार्शच्या नावावर होता. मार्शने पाकिस्तानविरोधात 240 चेंडू टाकले होते. परंतु या 240 चेंडूंमध्ये त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. मार्शचा हा लाजिरवाणा विक्रम सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत कॅमेरुन ग्रीन याने मोडीत काढला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या कसोटी मालिकेद्वारे कॅमरुन ग्रीनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. परंतु आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच कॅमरुन ग्रीन गोलंदाजीत फेल गेला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज कॅमेरुन ग्रीनने मिचेल मार्शचा 240 चेंडूपर्यंत विकेट मिळवू न शकल्याचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे ग्रीनचा हा दुष्काळ अजूनही सुरुच आहे. ग्रीनला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही. भारताच्या पहिल्या डावात ग्रीनने 8 षटकं गोलंदाजी केली. अद्याप त्याला एकही विकेट घेता आली नाही.

भारताच्या दुसऱ्या डावात तरी त्याला विकेट मिळते का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच त्याच्या आतापर्यंतच्या प्रभावहीन गोलंदाजीनंतर ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन भारताच्या दुसऱ्या डावात त्याच्या हाती चेंडू सोपवतो का ते पाहणेदेखील महत्त्वाचे आहे. दरम्यान इतक्या वाईट परफॉर्मन्सनंतरही एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरुन ग्रीनच्या समर्थनात मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराला वाटतं की हा 21 वर्षीय खेळाडू (कॅमेरुन ग्रीन) ब्रिस्बेन कसोटीचा निकाल बदलेल.

स्टिव्ह स्मिथ म्हणाला की, “कॅमेरून उद्या (सामन्याच्या शेवटच्या दिवशी) गोलंदाजीत कमाल करुन दाखवेल. तो खूप उंच आहे. तसेच खेळपट्टीवर मोठ्या भेगा पडल्या आहेत. उद्याच्या डावात त्याला त्याची उंची आणि खेळपट्टीवरील भेगांचा खूप फायदा होईल. त्याला गोलंदाजी करताना अतिरिक्त बाऊन्स मिळेल. तसेच खेळपट्टीवरील भेगांमुळे भारतीय फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणी येतील. त्यामुळे उद्याच्या डावात कॅमेरुन त्याची कसोटी कारकीर्दीतली पहिली विकेट मिळवेल. इतकंच काय तर तो उद्या सामन्याचा निकालही बदलू शकतो. उद्याच्या डावात कसलेली गोलंदाजी करण्यासाठी आणि विकेट्स मिळवण्यासाठी ग्रीन खूपच उस्तूक आहे. उद्याचा दिवस त्याच्यासाठी खास असेल, असं मला वाटतंय.”

सामना रंगतदार स्थितीत

ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येत असलेला चौथा कसोटी सामना (Aus vs Ind 4th Test) रंगतदार स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत बिनबाद 4 धावा केल्या. मात्र यानंतर पावसामुळे पुढे खेळ रद्द करावा लागला. यामुळे टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवशी 324 धावांचे आव्हान असणार आहे. हा सामना फार निर्णायक स्थितीत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. जो सामना जिंकेल तो मालिकाही जिंकेल.

हेही वाचा

Brisbane Test : 5 विकेट घेत कांगारुंना आस्मान दाखवणारा सिराज वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाला…

Aus vs Ind 4th Test | मोहम्मद सिराजची ‘फाईव्ह’ स्टार कामिगरी, मानाच्या पंगतीत स्थान

 टीम इंडियाला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी गावसकरांचा गुरुमंत्र

(Ind vs Aus: Steve Smith Believes Cameron Green Can Be Handful on Final day)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें