AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | विराट कोहली याचा महारेकॉर्ड, सचिनचा तो विक्रम अखेर मोडलाच

Virat Kohli Break Sachin Tendulakr Record | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात अखेर विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याचा तो महारेकॉर्ड मोडित काढत पराक्रम केला आहे. विराटने सचिनचा नक्की कोणता रेकॉर्ड ब्रेक केलाय जाणून घ्या.

World Cup 2023 | विराट कोहली याचा महारेकॉर्ड, सचिनचा तो विक्रम अखेर मोडलाच
| Updated on: Oct 09, 2023 | 12:08 PM
Share

चेन्नई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचव्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी मोठी भूमिका बजावली. केएल राहुल याने मैदानात अखेपर्यंत नाबाद राहत सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएलने नाबाद 97 धावा केल्या. केएलंच शतक अवघ्या 3 धावांनी अधुर राहिलं. तर विराट कोहली याने 6 चौकारांच्या मदतीने निर्णायक 85 रन्स केल्या. विराटने या खेळीसह सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडत वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

विराट कोहली चेस मास्टर

विराट कोहली अधिकृत चेस मास्टर ठरला आहे. विराट कोहली टीम इंडियाकडून क्रिकेट विश्वात विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने याबाबतीत टीम इंडियाचा दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी सचिनला मागे टाकण्यासाठी 59 धावांची गरज होती. विराटने 59 वी धाव पूर्ण करत सचिनला मागे टाकलं.

सर्वाधिक वनडे धावा (चेस करताना)

विराट कोहली – 5 हजार 517 धावा. सचिन तेंडुलकर – 5 हजार 490 धावा. रिकी पॉन्टिंग – 4 हजार 186 धावा. रोहित शर्मा – 3 हजार 983 धावा.

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थान मिळवलं आहे. दरम्यान टीम इंडिया आता आपला पुढील सामना हा बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असणार आहे. अफगाणिस्तानने आपला पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध गमावला. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.