IND vs AUS : कॅप्टन हरमनप्रीत कौर सलग सहाव्यांदा दुर्देवी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध काय झालं?
India vs Australia Women Toss Result : मेन्स टेस्ट टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलप्रमाणे महिला एकदिवसीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसोबतही तसंच झालंय. हरमनप्रीतने 2025 वर्षात टॉस गमावण्याची सलग सहावी वेळ ठरली आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया वूमन्स आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 मधील आपला चौथा तसेच स्पर्धेतील 13 वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील सामना विशाखापट्टणममधील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा दुर्देवी ठरली. ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन एलिसा हीली हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार आहे. तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. सोफी मोलिनेक्स हीला संधी देण्यात आली आहे. तर जॉर्जिया वॉरहॅम हीला बाहेर करण्यात आलं आहे.
दुर्देवी हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौर हीची 2025 या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस गमावण्याची सलग सहावी वेळ ठरली आहे. हरमनप्रीतने अखेरचा एकदिवसीय टॉस हा मायदेशात ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेल्या द्विपक्षीय मालिकेतील पहिल्या सामन्यात जिंकला होता. उभयसंघातील हा सामना 14 सप्टेंबरला खेळवण्यात आला होता. त्यानंतर भारताच्या विरोधात या मालिकेतील उर्वरित 2 तसेच वर्ल्ड कप स्पर्धेतील 4 सामन्यांत नाणेफेकीचा कौल लागला.
हरमनप्रीत कौर हीने आतापर्यंत 2025 वर्षात एकूण 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी हरमनप्रीतच्या बाजूने फक्त 5 वेळाच नाणेफेकीचा कौल लागला आहे. तर 10 वेळा भारताच्या विरोधात निकाल लागला आहे.
दरम्यान शुबमन गिल याच्याविरोधात कर्णधार झाल्यानंतर सलग 6 कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र त्यानंतर विंडीज विरूद्धच्या दुसर्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 10 ऑक्टोबरला शुबमनच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड आणि श्री चरणी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग आणि मेगन शट.
