AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN 2ND TEST: भारताने 285 धावांवर डाव केला घोषित, 52 धावांची आघाडी

भारत आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी सामना आता रंजक वळणावर आला आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पण चौथ्या दिवशी या सामन्याची रंगत वाढली आहे. बांगलादेशचा डाव 233 धावांवर आटोपला. त्या प्रत्युत्तरात भारताने 285 धावा करत डाव घोषित केला.

IND vs BAN 2ND TEST: भारताने 285 धावांवर डाव केला घोषित, 52 धावांची आघाडी
Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 30, 2024 | 5:38 PM
Share

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामन्याचा निकाल लागणार का? असा प्रश्न आहे. असं असताना चौथ्या दिवशी सामन्याचं रुपच पालटलं आहे. भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांवर रोखलं. तसेच या धावांचा पाठलाग करताना 9 गडी बाद 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी असून झटपट गडी बाद करण्यावर जोर असणार आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली खेळी केली. यशस्वी जयस्वालने 51 चेंडूत 72 धावा केल्या. तर केएल राहुलने 43 चेंडूत 68 धावा केल्या. विराट कोहलीचं अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. त्याने 35 चेंडूत 47 धावा केल्या. यावेळी त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. टीम इंडियाने अवघ्या 34.4 षटकांत या 285 धावा केल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि मेहदी हसन यांनी 4-4 विकेट घेतल्या.

भारताचं लक्ष लीडपेक्षा षटकं आणि वेळेवर आहे. चौथ्या दिवशी डाव घोषित केल्यानंतरही 19 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पण ही 19 षटकं पूर्ण होतील की नाही याबाबत शंका आहे. पण पाचव्या दिवशी 98 षटकांचा खळ होणार आहे. त्यामुळे बांगलादेशला झटपट बाद करत विजयी धावा करण्यासाठी प्रयत्न असेल. चौथ्या दिवशीची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सामन्यात चित्र बदलू शकतं.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून बांगलादेशची स्थिती नाजूक आहे. बांगलादेशने 26 धावा करत 2 गडी गमावल्या आहेत. आर अश्विनने 5 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले आहेत. भारताकडे अजूनही 26 धावांची आघाडी आहे. दरम्यान, सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Follow Us
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी...
मोठी बातमी! मोटेगावकरबाबत CBI ला वेगळाच संशय; NEET पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक खुलासा
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट
एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, राज्याच्या राजकारणात मोठं घडणार? थेट...
चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय?
Sandeep Deshpande | चेंबूर दुर्घटनेवर मनसे आक्रमक! BMC दोषींना वाचवतंय? संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत...

इराणचा मित्राकडूनच मोठा घात, शत्रूही करणार नाही असे काम, थेट ट्रम्प यांच्यासोबत हातमिळवणी करत..

Russia Oil :  युक्रेनने दिलं मोठं सरप्राइज, रशियावर आली भारताकडे तेल मागण्याची वेळ पण आपल्याकडे...

Russia Oil : युक्रेनने दिलं मोठं सरप्राइज, रशियावर आली भारताकडे तेल मागण्याची वेळ पण आपल्याकडे..

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन.

घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी, पोलिसांची वाचाच बसली; आसामच्या भिकाऱ्याचं निघालं महाराष्ट्राशी कनेक्शन

Adinath Kothare-Urmila Kanetkar Divorce : आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; लेक जिजाबद्दल म्हणाले...

Adinath Kothare-Urmila Kanetkar Divorce : आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; लेक जिजाबद्दल म्हणाले..

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?.

Vinayak Raut: विनायक राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार? राऊत यांनी दिले संकेत; काय घडणार?