AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 41 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वात सलग पाचवा विजय

India vs Bangladesh Super 4 Match Result : टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बांगलादेशला पराभूत करत सुपर 4 फेरीतील सलग दुसरा विजय मिळवला. भारताने यासह टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.

IND vs SL : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 41 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वात सलग पाचवा विजय
india vs bangladesh super 4 asia cup 2025Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Sep 25, 2025 | 1:51 AM
Share

टीम इंडियाने टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील एकूण चौथ्या सामन्यात बांगलादेशवर मात केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 41 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेशसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. टीम इंडियाच्या गोलंदाजंसमोर बांगलादेशला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला 19.3 ओव्हरमध्ये 127 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने यासह या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला. तसेच टीम इंडियाने या विजयासह अंतिम फेरीतही धडक दिली आहे.

अभिषेक शर्माची फटकेबाजी

अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव या दोघांनी टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच इतरांनीही चांगली साथ दिली. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 75 धावांचं योगदान दिलं. अभिषेकने या खेळीत 5 सिक्स आणि 6 फोर लगावले. अभिषेक व्यतिरिक्त टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या याने 38 धावा जोडल्या. शुबमन गिल याने 29 धावांचं योगदान दिलं. तर अक्षर पटेल याने नाबाद 10 धावा केल्या.

शिवम दुबे आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या तिघांनी निराशा केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशसाठी रिशाद होसैन याने दोघांना आऊट केलं. तर तंझीम साकिब, मुस्तफिजूर आणि सैफुद्दीन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची बॉलिंग

बांगलादेशला 169 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर जिंकणं सोडा धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 3 बॉलआधी ऑलआऊट केलं. बांगलादेशसाठी फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

ओपनर सैफ हसनैन याने सर्वाधिक धावा केल्या सैफने 51 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 69 रन्स केल्या. तर परवेझ एमोनने 21 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 7 धावांच्या पुढे जाता आलं नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. वरुण चक्रवर्ती याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा या दोघांनी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

टीम इंडियाचा विजयी पंच

टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. टीम इंडियाने सुपर 4 आधी साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते. टीम इंडियाने साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर मात केली होती.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या