IND v ENG Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

England vs India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

IND v ENG Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
भारत विरुद्ध इंग्लंड

नॉटिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.  दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ इंग्लंडशी (India vs England) भिडणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपच्या दुसऱ्या पर्वातील (World Test Championship 23) हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताचे याकडे लक्ष लागून आहे.

दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे भारतीय संघ रोहित शर्माबरोबर पाठवण्यासाठी सलामीवीर कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. यावेळी केएल राहुलला सलामीची संधी देण्याचीच दाट शक्यता आहे. तर सामन्यापूर्वी मैदानावर गवत दिसून आल्याने वेगवान गोलंदाजाना अधिक फायदा होऊ शकतो. ज्यामुळे भारत मोहम्मद सिराजला संधी देत एकूण चार वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. दुसरीकडे इंग्लंडचा हुकुमी एक्का बेन स्टोक्सने माघार घेतल्या इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

5 सामन्यांचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना 4 ते 8 ऑगस्ट (नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे)
  • दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट (लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर)
  • तिसरा कसोटी सामना 25 ते 29 ऑगस्ट (हेडिंग्ले)
  • चौथा कसोटी सामना 2 ते 6 सप्टेंबर (द ओवल)
  • पाचवा कसोटी सामना 10 ते 14 सप्टेंबर (मॅनचेस्टर)

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी  4 ऑगस्ट रोजी नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक करण्याक येईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यातील पहिला कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या या लिंकवर ही तुम्ही पाहू शकता.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

के एल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा 

IND vs ENG: ‘हा’ धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना

IND vs ENG : सलामीवीर मयांक पहिल्या सामन्याला मुकणार, ‘या’ पर्यांयाचा वापर करु शकते टीम इंडिया

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI