AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma | रोहित शर्माचा मोठा विक्रम, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

India vs England 1st Test | टीम इंडियाने पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कामगिरी करत घट्ट पकड मिळवली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने मोठा विक्रम केला आहे.

Rohit Sharma | रोहित शर्माचा मोठा विक्रम, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा
| Updated on: Jan 26, 2024 | 9:29 PM
Share

हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत रोहितसेनेने घट्ट पकड मिळवली आहे. इंग्लंडला 246 धावांवर ऑलआऊट करुन टीम इंडियाने पहिल्या दिवसापर्यंत 1 विकेट गमावून 1 विकेट गमावून 119 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 175 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसापर्यंत 7 विके्टस गमावून 421 धावा केल्या. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने 80 तर केएल राहुल याने 86 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा हा 81 धावांवर नाबाद परतला. केएल आणि यशस्वी शतक करण्यात अपयशी ठरले. मात्र आता तिसऱ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना रवींद्र जडेजाकडून शतक अपेक्षित आहे.

कॅप्टन रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत घट्ट पकड मिळवली आहे. रोहितला या पहिल्या डावात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. रोहितने आक्रमक सुरुवात केली. मात्र याचा आक्रमकतेने रोहितची विकेट गेली. रोहित 24 धावा करुन आऊट झाला. मात्र या 24 धावांनंतरही रोहितने मोठा विक्रम केला आहे.

रोहित शर्मा याने टीम इंडियाचा कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहित शर्मा टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक कॅच घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.तर या यादीत अव्वल स्थानी रनमशीन विराट कोहली हा विराजमान आहे.

अजिंक्य रहाणे याच्या नावावर आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील सामन्यांमध्ये 29 कॅचेसची नोंद आहे. तर रोहितने 28 व्या सामन्यात 30 कॅच पूर्ण केल्या आहेत. तर विराटच्या नावावर 36 सामन्यात 39 कॅचेसची नोंद आहे. तर सर्वाधिक कॅचचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याच्या नावावर आहे. स्टीव्हन स्मिथ याने 82 कॅच घेतल्या आहेत.

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.