भारताच्या शेपटीने इंग्लंडला रडवलं, बुमराह-शमीची रेकॉर्डब्रेक भागीदारी, 39 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील (Ind vs Eng 2nd test) पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमीने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. तसेच अभेद्य भागीदारी करत सामना इंग्लंडच्या हातून हिसकावला आहे.

भारताच्या शेपटीने इंग्लंडला रडवलं, बुमराह-शमीची रेकॉर्डब्रेक भागीदारी, 39 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 6:15 PM

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ज्यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा आहे, त्यांनी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलंय. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohhmeed Shami) या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघांनी 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील (Lords Cricket Ground) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Jaspreet Bumrah and Mohammad Shami record break partnership for Team India for the 9th wicket at Lord’s)

काय आहे विक्रम?

बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 77 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल (Madan Lal) आणि कपिल देव (Kapil Dev) यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती.

शमी आणि बुमराह या दोघांच्या फटकेबाजीमुळे पाचव्या दिवसातील पहिलं सत्रं भारताच्या नावावर झालं आहे. तसेच सामन्यावरील भारताची पकड मजबूत झाली आहे. लंचपर्यंत बुमराहने नाबाद 30 धावा केल्या. तर शमीने खणखणीत अर्धशतक केलंय. त्याने 67 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा फटकावल्या आहेत. तर बुमराहनेदेखील 2 चौकार फटकावले.

शमीचं इंग्लंड विरुद्ध दुसरं अर्धशतक

मोहम्मद शमीमे लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर षटकार ठोकत अर्धशतक साजरं केलं. शमीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरं अर्धशतक ठरलं आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही अर्धशतकं शमीने इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्याच मैदानात फटकावली आहेत. याआधी शमीने 2014 मध्ये नॉटिंगघममध्ये अर्धशतक लगावलं होतं.

पहिल्या सत्रात किती धावा?

भारताने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील 28 षटकांमध्ये 2 विकेट्च्या बदल्यात 4.04 च्या सरासरीने 105 धावा केल्या आहेत. लंचब्रेक झाला तेव्हा भारताची धावसंख्या ही 8 बाद 285 इतकी होती.

इतर बातम्या

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

टाटांच्या दिलदारपणाला हॅट्सऑफ, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळवणाऱ्या खेळाडूंनाही भारदस्त कार देणार

(IND vs ENG 2nd test day : Jaspreet Bumrah and Mohammad Shami record break partnership for Team India for the 9th wicket at Lord’s)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.