IND vs ENG : 26 चेंडू खेळनही जसप्रीत बुमराहच्या पदरी निराशा, झालं असं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. पण दुसऱ्या डावात २६ चेंडूचा सामना करणं खूपच जड केलं. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचं आव्हान दिलं आहे.

IND vs ENG : 26 चेंडू खेळनही जसप्रीत बुमराहच्या पदरी निराशा, झालं असं की...
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने व्यवस्थितरित्या 26 चेंडूचा सामना केला खरा, पण नको तेच झालं
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 3:50 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. कारण पहिला सामना जिंकत इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात भारताकडे १४३ धावांची आघाडी होती. तसेच भारताने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि ३९८ धावा झाल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि अक्षर पटेल वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर या धावा रोखण्याचं मोठं आव्हान आहे. कारण इंग्लंडची बेझबॉल निती कधी काय करेल सांगता येत नाही. असं सर्व चित्र असताना दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहवर नको ती वेळ आली. संघाच्या धावांमध्ये भर घालण्यासाठी जसप्रीत बुमराहने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण पदरी निराशा पडली.

जसप्रीत बुमराहने आर अश्विनसोबत नवव्या गड्यासाठी जबरदस्त साथ दिली. दोघांनी मिळून २६ धावांची भागीदारी केली. पण या भागीदारीत जसप्रीत बुमराहचं योगदान शून्य होतं. इतकंच काय तर जसप्रीत बुमराहने या भागीदारी २६ चेंडूंचा सामना केला. पण एकही धाव घेता आली नाही. जसप्रीत बुमराह २६ चेंडू खेळत शू्न्यावर बाद झाला. टॉम हार्टलेच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने त्याचा उत्तम झेल घेत तंबूत पाठवलं. त्यामुळे २६ चेंडू खेळून एकही धाव न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते. दुसरीकडे, तळाचे तीन फलंदाज शून्यावर राहीले. कुलदीप यादव ५ चेंडूत खेळत शून्यावर बाद झाला. तर मुकेश कुमार २ चेंडू खेळत शून्यावर नाबाद राहिला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

Non Stop LIVE Update
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल.
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.