AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लॉर्ड्समध्ये मैदानात हाणामारी! जडेजाचं या इंग्लिश गोलंदाजासोबत वाजलं, बेन स्टोक्सने केला हस्तक्षेप

भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात निराशा पदरी पडली. भारतासमोर विजय असताना पराभवाची धूळ खाल्ली. यात केएल राहुलनंतर रवींद्र जडेजाने काय ती झुंज दिली. पण या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडला आणि वातावरण तापलं.

Video : लॉर्ड्समध्ये मैदानात हाणामारी! जडेजाचं या इंग्लिश गोलंदाजासोबत वाजलं, बेन स्टोक्सने केला हस्तक्षेप
लॉर्ड्समध्ये मैदानात हाणामारी! जडेजाचं या इंग्लिश गोलंदाजासोबत वाजलंImage Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Jul 14, 2025 | 9:30 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना उत्कंठा वाढणारा ठरला. भारतासमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला. भारताला विजयासाठी 23 धावा कमी पडल्या. तसेच इंग्लंडने हा सामना 22 जिंकला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यामुळे लॉर्ड्सवर चौथा सामना जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं. यासह भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फटका बसला आहे. भारतीय संघाची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच विजयी टक्केवारीत घट झाली आहे. आता भारतीय संघाला पुढचा प्रवास खूपच कठीण जाईल असं दिसत आहे. दरम्यान, या सामन्याला वादाची किनार लाभली. या सामन्यात सर्वाधिक वाद झाले. शेवटच्या दिवशीही जडेजा आणि कार्स यांच्यात वाद झाला.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात वाद झाला. दुसऱ्या डावाच्या 35व्या षटाकच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला. यामुळे मैदानात वातावरण चांगलंच तापलं होतं. शेवटच्या चेंडूवर जडेजा धाव घेण्यासाठी धावत होता. तेव्हा ब्रायडन कार्सला धडकला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, जडेजाने 150 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. विजयासाठी त्याने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने सलग चौथं अर्धशतक झळकावलं आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात एकाकी झुंज दिली. त्याने 181 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 61 धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने काही साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताने हा सामना गमावला.

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील हा काही पहिला वाद नाही. यापूर्वीही दोन्ही संघांमध्ये वाद झाला. गिल आणि जॅक क्राउली यांच्यात तिसऱ्या दिवशी वाद झाला होता. क्राउली वेळ वाया घालवत असल्याचं पाहून त्याला राग अनावर झाला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी ब्रायडन कार्स आणि आकाश दीप यांच्यातही असंच काहीसं घडलं होतं.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.