AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG T20i Series : 12 दिवस आणि 5 सामने, इंडिया-इंग्लंड मालिकेतील सामने कुठे पाहता येणार?

India vs England T20i Series 2025 Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

IND vs ENG T20i Series : 12 दिवस आणि 5 सामने, इंडिया-इंग्लंड मालिकेतील सामने कुठे पाहता येणार?
jos buttler and suryakumar yadav ind vs engImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 20, 2025 | 7:47 PM
Share

टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार झाली आहे. टीम इंडिया नववर्षात आणि मायदेशात पहिलीवहिली आणि टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड इंग्लंड विरुद्ध मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते या सामन्यांची उत्साहाने वाट पाहत आहेत. हे सर्व सामने कुठे टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? हे जाणून घेऊयात.

उभयसंघात एकूण 12 दिवस या मालिकेचा थरार रंगणार आहे. मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 2 फेब्रुवारी शेवटचा सामना पार पडणार आहे. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळतील.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्यांना किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचही सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन

दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई

तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट

चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे

पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.