AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : “त्याने चांगलं केलं तर काय..” उपकर्णधार होताच शुबमनची भाषा बदलली, पाहा व्हीडिओ

Shubman Gill on Karun Nair : उपकर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. मात्र शुबमन करुण नायर याला संधी न मिळण्यावरुन जे बोललाय ते अनेकांना खटकलंय.

IND vs ENG : त्याने चांगलं केलं तर काय.. उपकर्णधार होताच शुबमनची भाषा बदलली, पाहा व्हीडिओ
karun nair and shubman gill
| Updated on: Feb 05, 2025 | 9:29 AM
Share

टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघात 6 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. सलामीचा सामना हा व्हीसीए स्टेडियम, नागपूर येथे होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही शेवटची मालिका आहे. त्यामुळे ही मालिका फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने या वनडे सीरिजमधील खेळाडूंनाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संधी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. तर युवा सलामीवीर शुबमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

टीम इंडियात हार्दिक पंड्या, केएल राहुल यासारखे अनुभवी खेळाडू असूनही शुबमन गिल याला उपकर्णधार केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. शुबमनने उपकर्णधार म्हणून या मालिकेआधी 4 फेब्रुवारीला पत्रकारांशी संवाद साधला. शुबमनने या दरम्यान टीम इंडियाचा त्रिशतकवीर करुण नायर याच्याबाबत संघात स्थान न मिळाल्यावरुन प्रतिक्रिया दिली.

करुण नायरची कामगिरी

बीसीसीआय निवड समिती अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी 18 जानेवारीला मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला. विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरीनंतर करुण नायर याचं भारतीय संघात अनेक वर्षांनंतर कमबॅक होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र करुणला संधी मिळालीच नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. करुणने या स्पर्धेतील 8 डावांमध्ये 389.50 च्या सरासरीने 779 धावा केल्या.

शुबमन गिल काय म्हणाला?

“करुण याने विजय हजारे ट्रॉफीत शानदार कामगिरी केली, पण याचा अर्थ असा नाही की जे सद्या टीममध्ये आहेत त्यांना बाहेर केलं जावं. त्यांनीही इथवर पोहचण्यासाठी चांगली कामगिरी केली आहे”, असं शुबमनने स्पष्ट केलं. शुबमनच्या या प्रतिक्रियेनंतर त्याची उपकर्णधार होताच भाषा बदललीय, असं क्रिकेट चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.

गिलची भाषा बदलली!

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.