AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या सलामीच्या जोडीबाबत बदल सुचवला आहे. त्यांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहितऐवजी मंयकला सलामीला खेळवावं : सुनील गावस्कर
Rohit Sharma
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 27, 2021 | 4:26 PM
Share

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (ICC World Test Championship Final) पराभवामागे भारतीय संघाची (Indian Cricket Team) कमकुवत फलंदाजी हे सर्वाधिक चिंतेचे कारण ठरले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी भरलेल्या भारतीय फलंदाजीला संपूर्ण सामन्यात एकही अर्धशतक करता आले नाही. विशेषत: दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज शरणागती पत्करताना दिसले. दरम्यान, ऑगस्टपासून खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत काही मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मुख्यत: मधल्या फळीविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताच्या सलामीच्या जोडीबाबत बदल सुचवला आहे. त्यांच्या मते रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Games)

भारतीय संघात, प्रामुख्याने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी गेल्या जवळपास 2 वर्षांपासून एकही शतक झळकावलेलं नाही. पुजाराने शेवटचे शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ठोकलं होतं. त्यानंतर त्याला कोणतीही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर अंतिम सामन्यातही अपयशी ठरल्यानंतर पुजाराच्या जागी भारतीय संघ केएल राहुल किंवा इतर कोणत्याही फलंदाजाला संधी देऊ शकतो, अशी चर्चा आहे. तथापि, गावस्कर याबाबत सहमत नाहीत आणि पुजाराचे संघातील स्थान कायम ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवाल याला सलामीला मैदानात उतरवावे, अशी सूचना गावस्कर यांनी केली आहे.

सराव सामन्यात मयंक-शुबमन जोडी सलामीला येईल

सराव सामन्यात मयंक-शुबमन जोडी सलामीला येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु हे खरे आहे. वास्तविक इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला सराव सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे. गावसकरांना असा विश्वास आहे की, या सराव सामन्यात रोहितला संधी न देता मयंक आणि शुभमन ही जोडी सलामीला उतरवली पाहिजे आणि त्यानंतर कसोटी मालिकेत रोहितसोबत सलामीवीर कोण असेल, हे ठरवावे. स्पोर्ट्स तकशी बोलताना गावस्करांनी अशी सूचना दिली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट
  • दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट
  • तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट
  • चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर
  • पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

इतर बातम्या

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा

(IND vs ENG : Sunil Gavaskar Suggests India Should Try Mayank Agarwal And Shubman Gill As Opener In Practice Games)

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?