AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsNZ 1st ODI : टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कोण जिंकणार सामना?

टीम इंडियाने श्रीलंकेचा टी 20 आणि वनडे मालिकेत धुव्वा उडवला. आता रोहितसेनेसमोर न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

INDvsNZ 1st ODI : टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कोण जिंकणार सामना?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 17, 2023 | 10:41 PM
Share

हैदराबाद : टीम इंडियाने श्रीलंकेचा एकदिवसीय मालिकेत 3-0 ने सूपडा साफ केला. त्यानंतर आता टीम इंडियाचा सामना न्यूझींलड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 18 जानेवारीला हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

आकडे काय सांगतात?

टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात आतापर्यंत 113 वेळा आमनासामना झाला आहे. मात्र यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिलाय. टीम इंडियाने 113 पैकी 55 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर न्यूझीलंडने टीम इंडियाला 55 सामन्यात पराभूत केलंय. 1 सामना टाय झालाय. तर 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल?

या मालिकेत केएल राहुल विवाहासाठी सुट्टीवर आहे. तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. यामुळे आता टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच बदल होणार आहे. श्रेयसच्या जागी रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याऐवजी संघात सूर्यकुमार यादवची जागा नक्की मानली जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला केएल राहुलच्या जागी इशान किशनचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप आणखी मजबूत होईल. तर ऑलराउंड खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर असू शकतात.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

टीम न्यूझीलंड

टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर

Follow Us
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी दिलं रंजक उत्तर
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी दिलं रंजक उत्तर
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...