कॅच नाही, मॅच सोडली! प्रसिद्ध कृष्णाची घोडचूक, डॅरेल मिचेलला जीवनदान
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एक चूक महागात पडली. खरं तर मालिका जिंकण्यासाठी महत्त्वाचा होता. पण प्रसिद्ध कृष्णाची चूक महागात पडली. कसं काय ते समजून ग्या

वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 284 धावा केल्या आणि विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं. खरं तर या मैदानावर या धावा पुष्कळ मानल्या जातात. पण काही चुका भारतीय संघाला नडल्या आणि त्याचा फटका बसला. विजयी धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. डेवॉन कॉनव्हे आणि हेन्री निकोलस या दोन विकेट झटपट पडल्या. अवघ्या 46 धावांवर दोन खेळाडू तंबूत होते. त्यामुळे हा सामना टीम इंडियाच्या पारड्यात झुकलेला होता. पण विल यंग आणि डेरिल मिचेलने भारताच्या विजयाला खोडा घातला असंच म्हणावं लागेल. कारण या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोडणं कठीण झालं होतं. ही संधी कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर आली होती. पण त्यातही प्रसिद्ध कृष्णाने चूक केली.
दुसऱ्या वनडे सामन्यात डेरिल मिचेल 80 धावांवर खेळत होता. कुलदीप यादव 36वं षटक टाकण्यासाठी आला. तेव्हा विल यंग स्ट्राईकला होता. त्याने पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारले. त्यानंतर एक धाव घेतली आणि डेरिल मिचेलला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर डेरिल मिचेल बरोबर कुलदीप यादवच्या जाळ्यात अडकला होता. पण प्रसिद्ध कृष्णाने सोपा झेल सोडला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. कारण डेरिल मिचेल त्यानंतर शतक ठोकलं. तसेच न्यूझीलंडला विजयाच्या वेशीवर नेऊन सोडलं.
#INDvNZ 🚨Prasidh Krishna just dropped an important match saving catch!!!!!
Kuldeep Yadav got disappointed!!!
Both Young and Darell Mitchell have 80+ on board building match winning partnership !!! #TeamIndia pic.twitter.com/1uFC4cXGKd
— SportsHub__Redhawks07 (@SportsHub_Red07) January 14, 2026
भारताला प्रसिद्ध कृष्णाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला असंच म्हणावं लागेल. कारण डेरिल मिचेलची विकेट पडली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण तसं काही झालं नाही. त्यानंतर डेरिल मिचेलच्या प्रत्येक धावेनंतर सामना दूर गेला. डेरिल मिचेलने हा सामना जिंकून दिला. त्याने शेवटपर्यंत लढा दिला आणि 117 चेंडूत नाबाद 131 धावा केल्या. भारताने विजयासाठी दिलेल्या 285 धावा न्यूझीलंडने 3 गडी गमवून 48व्या षटकात पूर्ण केल्या.