IND vs NZ, 2nd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध मालिका विजयाची संधी, मॅच कुठं पाहणार?

पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया सहज मॅच जिंकेल अशी स्थिती असताना संघर्ष करावा लागला होता. आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा इशान किशनला संधी देण्याची शक्यता आहे.

IND vs NZ, 2nd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध मालिका विजयाची संधी, मॅच कुठं पाहणार?
India vs New zealand


मुंबई : टीम इंडियानं जयपूर येथील पहिल्या टी-20 न्यूझीलंडला पराभूत केलं. आज रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये विजय मिळवत मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. यासाठी रोहित शर्माच्या टीमला शानदार खेळ करावा लागेल. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया सहज मॅच जिंकेल अशी स्थिती असताना संघर्ष करावा लागला होता. आजच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा इशान किशनला संधी देण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आजच्या मॅचसाठी के.एल. राहुल याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. आज रांची या होम ग्राऊंडवर इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया विजय मिळवत मालिका जिंकणार का हे पाहावं लागणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड टी-20 यांच्यातील दुसरा सामना कधी खेळवला जाणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 19 नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी सुरू होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

भारत आणि न्यूझीलंडमधील लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?

Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग XI

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन

मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), जिमी नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, ईश सोढी, काइल जेमिसन

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी

भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इतर बातम्या:

IND vs NZ: माजी खेळाडू रोहितच्या कामगिरीवर नाराज, विजयानंतरही नेतृत्वाबाबत उपस्थित केले सवाल

IND vs NZ: रोहित शर्माने डगआउटमध्ये जखमी मोहम्मद सिराजला मारलं, VIDEO व्हायरल

Ind vs nz 2nd t20 live streaming know when and where to watch match

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI