AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ऋषभ पंत वेगवेगळ्या डिझाइनचे बूट घालून फलंदाजीला उतरला, सेहवागचा विक्रमही मोडला

भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. कारण दुसऱ्याच दिवशी पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. असं असताना ऋषभ पंतची बूट चर्चेचा विषय ठरत आहेत.

IND vs SA: ऋषभ पंत वेगवेगळ्या डिझाइनचे बूट घालून फलंदाजीला उतरला, सेहवागचा विक्रमही मोडला
IND vs SA: ऋषभ पंत वेगवेगळ्या डिझाइनचे बूट घालून फलंदाजीला उतरला, सेहवागचा विक्रमही मोडलाImage Credit source: PTI
| Updated on: Nov 15, 2025 | 3:27 PM
Share

Rishabh Pant Shoe: विकेटकीपर फलंदाज आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पायाला दुखापत झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 159 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 189 धावांवर आटोपला. फक्त 30 धावांची आघाडी भारताकडे आहे. तर ऋषभ पंतने 2 चौकार आणि 2 षटकार मारत 27 धावांची खेळी करून बाद झाला. पण यावेळी क्रीडाप्रेमींचं लक्ष त्याच्या पायाकडे होते. त्याच्या पायात असलेले दोन्ही बूट वेगवेगळे होते. त्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता.

कर्णधार शुबमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला होता. तेव्हा त्याच्या पायाकडे कॅमेरा वळला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याच्या एका बुटाच्या पुढे काळा पॅच होता. तर दुसऱ्या बुटाचा पॅच हा पांढराच होता. पंतने काळ्या रंगाचा पॅच असलेलं बूट दुखापत झालेल्या पायात घातलं होतं. नुकताच त्या पायाला झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. कदाचित त्या पायाला दुखापत झालेली पाहता त्यासाठी विशिष्ट पद्धतीने बूट डिझाईन केलं असण्याची शक्यता आहे. मून बूट असण्याची शक्यता आहे. या बुटांना वॉकिंग बूट किंवा ऑर्थोपेडिक बूट असंही म्हंटलं जातं. सामान्यतः फ्रॅक्चर, लिगामेंट फाटणे किंवा पाय आणि घोट्याच्या भागात गंभीर जखमा झालेल्या रुग्णांना असे बूट दिले जातात.

ऋषभ पंतने या सामन्यात एक मोठा विक्रम मोडला आहे. 27 धावा केल्या असल्या तरी वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वीरेंद्र सेहवागच्या नावावर असलेला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वीरेंद्र सेहवागने कसोटीत 90 षटकार मारले होते. कोलकाता कसोटीपूर्वी ऋषभ पंत आणि सेहवागच्या षटकारांची बरोबरी होती. पण पहिला षटकार मारताच त्याने सेहवागचा विक्रम मोडीत काढला. आता त्याच्या नावावर 92 षटकार असून आघाडीवर आहे. यात येत्या काही कसोटी भर पडणार यात काही शंका नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.