AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tilak Varma : नवा पण छावा, तिलक वर्मा याचा अफलातून झेल, पाहा Video

TIlak Varma Super Catch : तिलक वर्मा याने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. कारण बॅटींगला येण्याआधीच त्याने आपली  निवड सार्थ ठरवल्याचं दाखवून दिलं. कॅरेबियन संघ बॅटींग करत असताना फिल्डिंगवेळी तिल वर्मा याने एक अप्रतिम झेल घेतला.

Tilak Varma : नवा पण छावा, तिलक वर्मा याचा अफलातून झेल, पाहा Video
| Updated on: Aug 04, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव झाला आहे.  या सामन्यामध्ये दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केलं आणि दोघांनीही चमकदार कामगिरी केली. परंतु संघाला काही विजय मिळवून देऊ शकले नाहीत. एक मुकेश कुमार आणि दुसरा तिलक वर्मा हा आहे. दोघांपैकी तिलक वर्मा याने सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. कारण बॅटींगला येण्याआधीच त्याने आपली  निवड सार्थ ठरवल्याचं दाखवून दिलं. कॅरेबियन संघ बॅटींग करत असताना फिल्डिंगवेळी तिलक वर्मा याने एक अप्रतिम झेल घेतला.

पाहा व्हिडीओ :- 

टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आठवी ओव्हर टाकत होता. तर वेस्ट इंडिजचा कीपर बॅट्समन जॉन्सन चार्ल्स याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर न झाल्याने कॅच उडाला, त्यावेळी तीन खेळाडू कॅच पकडण्यासाठी धावले.

तिन्ही खेळाडूंपासून चेंडू तसा दूरच होता मात्र तिलक वर्मा याने रनिंग कॅच घेतला. तो जोरात धावत आला आणि कॅच घेत त्याने बॅलन्स करत स्वत:ला सावरलं. रनिंग कॅच तसा अवघड होता परंतु तो चित्यासारखा पळत आला आणि कॅच घेतला.

तिलक वर्मा याने आधी फिल्डिंग आणि त्यानंतर बॅटींगमध्ये आपली चमक दाखवली. तिलक वर्मा याने  22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. पहिला चेंडू निर्धाव खेळला मात्र पुढील दोन चेंडूंवर त्याने सलग दोन षटकार मारत आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.