AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs WI : रोहित शर्मा याची ही गोष्ट अतीच झाली, भर सामन्यात इशान किशनला…पाहा Video

IND vs WI 1 Test :  या सामन्यानमधील रोहित शर्माचे काही व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाले. त्यामधील एक म्हणजे रोहितने बॅटींग करत असताना दिलेल्या शिवीचा, त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे.

Ind vs WI : रोहित शर्मा याची ही गोष्ट अतीच झाली, भर सामन्यात इशान किशनला...पाहा Video
| Updated on: Jul 15, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 141 धावा डावाने विजय मिळवला आहे. तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने कॅरेबियन संघाला पराभवाचं पाणी पाजलं. युवा खेळाडू पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल याला सामनवीर म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यामधील रोहित शर्माचे काही व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाले. त्यामधील एक म्हणजे रोहितने बॅटींग करत असताना दिलेल्या शिवीचा, त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे.

रोहित शर्मा इशान किशनवर भडकला?

कर्णधार रोहित शर्माने त्याचा मुंबई इंडियन्समधील सहकारी खेळाडू इशान किशनवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  टीम इंडियाने आपला डाव 421 धावांवर घोषित केला त्यावेळी मैदानामध्ये रविंद्र जडेजा आणि इशान किशन होते.

आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या किशनने बॅटींगला आल्यावर पहिली धाव काढण्यासाठी तब्बल 21 चेंडू घेतले. त्यामुळे रोहित शर्मा वैतागला भारताला आपला डाव घोषित करायचा होता पण विराट कोहली बाद झाल्यावर इशान किशला गेला. पहिलाच सामना असल्यामुळे त्याने खातं उघडल्यावर डाव घोषित करायचा असा रोहितचा प्लॅन असावा. पंरतु किशनने खातं उघडण्यासाठी 21 चेंडू घेतले त्यामुळे रोहितचा पारा चढल्याची माहिती समजत आहे.

पाहा व्हिडीओ :-

दरम्यान, भारताने आपला डाव 421 धावांवर घोषित केल्यावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही फार काही कमाल केली नाही. आधी 150 आणि दुसऱ्या डावामध्येतर 130 धावांवरच कार्यक्रम गुंडाळला. आता दुसरा सामना 20 जुलैला सुरू होणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.