AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी का घातली? खरं कारण आलं समोर

IND vs WI : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्या वनडे अक्षरश: लोळवलं. पाच गडी राखून विजय मिळवला आणि 1-0 ने आघाडी घेतली. पण या सामन्यात चर्चा झाली ती सूर्यकुमार यादव याच्या जर्सीची..

IND vs WI : सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी का घातली? खरं कारण आलं समोर
IND vs WI : सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसन याची जर्सी घातल्याने एकच चर्चा, असं करावं लागलं कारण...
| Updated on: Jul 28, 2023 | 2:27 PM
Share

मुंबई : वर्ल्डकप 2023 च्या दृष्टीकोनातून भारताला प्रत्येक वनडे मालिका आता महत्त्वाची आहे. शितावरून भाताची परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच वर्ल्डकप संघात योग्य खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. त्या दृष्टीने भारताने वेस्ट इंडिजला त्यांच्यात धरतीत लोळवून सुरुवात केली आहे. या सामन्यात कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. दुसरीकडे, प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला जागा न मिळाल्याने चर्चा रंगली आहे. त्यात सूर्यकुमार यादव हा संजू सॅमसनची जर्सी घालून मैदानात उतरल्याने चर्चांना मोकळी वाट मिळाली. सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी का घातली असावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर काही जण त्याला ट्रोल देखील करत आहेत. असं असताना सूर्यकुमार यादव याने संजू सॅमसनची जर्सी घालण्याचं खरं कारण समोर आलं आहे.

…म्हणून सूर्यकुमार यादवने घातली संजू सॅमसनची जर्सी

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, सूर्यकुमार यादव याला त्याच्या साइजची जर्सी मिळाली नव्हती. सूर्यकुमार यादव लार्ज साईजची जर्सी परिधान करतो. पण त्याला एक साईज छोटी जर्सी मिळाली. सूर्यकुमार यादवने याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली. मात्र सामन्यापूर्वी जर्सी उपलब्ध नसल्याने संजू सॅमसनची जर्सी घालून सूर्यकुमार यादव मैदानात उतरला.

पुढच्या सामन्यातही सूर्यकुमार यादव हा संजू सॅमसनची जर्सी घालूनच मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाने टी 20 मालिकेसाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या हाती सूर्यकुमार आणि अन्य खेळाडूंच्या साईजची जर्सी पाठवली आहे. ही जर्सी दुसऱ्या वनडे नंतरच मिळण्याची शक्यता आहे.

नवा स्पॉन्सर मिळाल्याने जर्सी बदलली

बीसीसीआयने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरशिपसाठी एडिडाससोबत करार केला आहे. त्यानंतर नवी जर्सी लाँच करण्यात आली होती. पण त्याच्या साईजबाबत खेळाडूंना अडचण येत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

सूर्यकुमार यादवच्या जर्सीवर सॅमसन लिहिलेले होते आणि 9 क्रमांकही होता.सूर्यकुमार जर्सी घालून मैदानात आला तेव्हा नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सूर्यकुमार यादव याने 25 चेंडूत 19 धावा केल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मोटीच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.