India vs Pakistan सामन्यात ‘हल्ला’, सामना थांबवावा लागला; मैदानात पसरला धूर
भारत पाकिस्तान यांच्यात खेळाडूंना विचित्र त्रासाला सामोरं जावं लागलं. यात फक्त भारतीय खेळाडूच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूंनाही त्रास झाला. त्यामुळे तात्काळ मैदान मोकळं करण्याची वेळ आली.

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान यांच्यात लढत सुरु होती. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताची सुरुवात संथ झाली. पण पहिल्या विकेटसाठी पाकिस्तानला चांगलंच झुंजवलं. या सामन्यात भारतीय फलंदाज फलंदाजी करत असताना विचित्र समस्येला सामोरं जावं लागलं. या सामन्यात भारतीय फलंदाजांवर वारंवार हल्ला होत होता. यामुळे सामना थांबवण्याची वेळ आली. हा हल्ला कोण्या व्यक्तीने किंवा प्राण्याने केला नाही तर हा हल्ला कीटकांचा होता. त्यामुळे फलंदाजी करताना आसपास घोंघावणाऱ्या कीटकांमुळे फलंदाजीत अडसर येत होता. इतकंच काय तर पाकिस्तानच्या विकेटकीपरला त्रास होता. त्यामुळे वारंवार सामना थांबवून कीटक पळवण्याचं काम सुरु होतं. फलंदाजाच्या डोक्यावर हजारोच्या संख्येने कीटक आणि माश्या घोंघावत होत्या. त्यामुळे वारंवार अडचणीचा सामना करावा लागत होता.
भारत पाकिस्तान सामना त्यामुळे 2 ते 3 मिनिटं थांबवला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाकिस्तानने स्प्रे आणून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची संख्या पाहता ते काय पळणार नाहीत याची जाणीव क्रीडाप्रेमींना होती. त्यानंतर पुन्हा सामना सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण कीटकांचा उपद्रव आणखी वाढला. त्यामुळे 34वं षटक संपताच पंचांनी सामना थांबवला आणि धूरवाल्याला बोलवलं. खेळाडूंना बाहेर केलं आणि मैदानातील कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी धूर फवारणी सुरु झाली. यामुले सामना 15 मिनिटे थांबवला. मात्र त्यानंतर कीटकांमुळे सामना थांबवण्याची पुन्हा वेळ आली नाही.
Not rain, not light… but bugs! Pak vs Ind Women’s World Cup clash halted for pest control spray#WomensWorldCup #INDWvsPAKW #WorldCup #Indiancricketteam #bharatarmy #coti🇮🇳 pic.twitter.com/oP8TGV79Yw
— The Bharat Army (@thebharatarmy) October 5, 2025
भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 247 धावा केल्या आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव डळमळीत झाला. पण सिद्रा अमिनने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. एका बाजूने विकेट पडत असताना तिने दुसऱ्या बाजूने लढा सुरुच ठेवला. तिने अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्यामुळे तिची विकेट भारतासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे.
