AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता! आयपीएल स्पर्धा रद्द होणार?

India vs Pakistan Ipl 2025 : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत चांगलीच अद्दल घडवली आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मात्र यानंतर आयपीएलचा 18 वा मोसम (IPL 2025) रद्द केला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.

IPL 2025 : भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता! आयपीएल स्पर्धा रद्द होणार?
India air strike Ipl 2025Image Credit source: PTI
| Updated on: May 07, 2025 | 12:42 PM
Share

भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारताने केलेल्या या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर‘अंतर्गत ही कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तानही प्रत्युतरात भारतावर हल्ला करु शकतं. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएलचं 18 वा मोसम रद्द होऊ शकतो. भारतातील अनेक शहरांमध्ये सध्या आयपीएल 2025 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आहे.

आयपीएलचा 18 वा मोसम अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफसाठीच्या 4 जागांसाठी 7 संघामध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मात्र या दरम्यान भारताने एअर स्ट्राईक केल्याने शेजारी देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचा परिणाम आयपीएल 2025 वर होऊ शकतो. तसं झाल्यास हा हंगाम रद्द होऊ शकतो.

भारताने बुधवारी सारा देश झोपेत असताना शेजारी पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. भारताने यासह दहशतवाद्यांची 9 तळं उद्धवस्त केली. तर त्याआधी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 56 वा सामना पार पडला. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर वानखेडे स्टेडियममध्ये डीएलएसनुसार 3 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याच्या काही वेळानी भारतीय सैन्याकडून पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यात आल्या. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर युद्ध होण्याची शक्यता खरी ठरली तर काय? अशा परिस्थितीत नाईलाजाने आयपीएलचा 18 वा मोसम रद्द करावा लागू शकतो. या प्रकरणाकडे बीसीसीआय आयपीएल गव्हर्निंग काउंसिलचं लक्ष आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काउंसिल परिस्थिती पाहता याबाबत निर्णय घेऊ शकते. मात्र सध्या परिस्थिती  नियंत्रणात आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने खेळवण्यात येतील, यात शंका नाही.

IPL 2025 सुरळीत पार पडणार!

25 मे रोजी अंतिम सामना

दरम्यान आयपीएलच्या 18 व्या मोसमात भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी खेळाडूही सहभागी आहेत. भारतीय खेळाडू मायदेशात खेळत असल्याने निश्चिंत आहेत. मात्र या हल्ल्यामुळे विदेशी खेळाडूंना काही प्रमाणात चिंता आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामना 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.