IND vs AUS : ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान, ऋतुराज गायकवाडची झुंझार शतकी खेळी
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताची सुरुवात हवी तशी झाली नाही. पण ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. त्यानंतर ऋतुराजने मोठी खेळी करत संघासाठी संकटमोटक ठरला.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. भारताने मालिकेतील सलग दोन सामने जिंकत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. पण आता भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दिलेलं आव्हान रोखण्यात यशस्वी ठरते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 222 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय गोलंदाजांची आता हे आव्हान रोखण्यासाठी कसोटी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून मॅथ्यू वेडनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय काही अंशी खरा ठरला. भारताचे दोन फलंदाजी झटपट बाद झाल्याने दबाव वाढला होता. पण सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर ऋतुराजने मोर्चा सांभाळला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
भारताचा डाव
भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल जोडी मैदानात उतरली. यशस्वी जयस्वाल काही खास करू शकला नाही. अवघ्या 6 धावा करून बाद झाला. संघाची धावसंख्या 14 असताना यशस्वी जयस्वाल बाद झाला. त्यानंतर संघाच्या 24 धावा असताना इशान किशन बाद झाला. इशान किशन खातंही न खोलता बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने 57 चेंडूत 123 धावांची खेली केली. यात 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. त्याला तिलक वर्माने साथ दिलीय. तिलक वर्माने 24 चेंडूत 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि एरॉन हार्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, एरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन