AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची या तारखेला घोषणा! कर्णधारासाठी बीसीसीआयचा प्लान काय?

India Tour Of England 2025 Schedule : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची केव्हा घोषणा होणार? जाणून घ्या.

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची या तारखेला घोषणा! कर्णधारासाठी बीसीसीआयचा प्लान काय?
Jasprit Bumrah Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: May 10, 2025 | 5:46 PM
Share

आयपीएल 2025 मधील उर्वरित 16 सामने हे भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावामुळे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयने 9 मे रोजी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध एकूण 5 कसोटी मालिका खेळणार आहे. भारताच्या या दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच ‘टीम इंडिया ए’ या दरम्यान इंग्लंड लायन्स विरुद्ध 3-4 दिवसीय सामना खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती लवकरच कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे निवड समितीसमोर कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला द्यायची? हा मोठा प्रश्न असणार आहे.

केव्हा होणार संघ जाहीर?

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? कुणाला संधी मिळणार? याबाबतची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 25 मे रोजी टीम इंडिया ए इंग्लंडसाठी रवाना होऊ शकते. तर रविवारी 11 मे रोजी इंडिया ए टीमच्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

बीसीसीआय एक्शन मोडमध्ये

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना पासपोर्टसाठी आणि इतर आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जर्सी साईजसाठी लॉजिस्टिक्ससह संपर्क करण्यात आला आहे. तसेच 23 मे रोजी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते

कर्णधार कोण?

रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची धुरा कोण सांभाळणार? निवड समिती कुणाला संधी देणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना आहेत. बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा ही पत्रकार परिषदेद्वारे केली जाऊ शकते. सध्या शुबमन गिल याचं कर्णधार म्हणून नाव आघाडीवर आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले
  • दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, बर्मिंगघम
  • तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लंडन
  • चौथा सामना, 23 ते 27 जुलै, मँचेस्टर
  • पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, लंडन

20 जूनपासून श्रीगणेशा

दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिली मालिका असणार आहे.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.