AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs NEDW Womens T20 WC Score Highlight : टीम इंडियाचा विजय, नेदरलँड्सवर 95 धावांनी मात

| Updated on: Jun 18, 2026 | 4:12 AM
Share

India vs Netherlands, Womens T20 World Cup 2026 Scocre Updates and Highlights : भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. स्मृती मंधाना आणि श्री चरणी या दोघींनी भारताच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. स्मृतीने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर श्रीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.

INDW vs NEDW Womens T20 WC Score Highlight : टीम इंडियाचा विजय, नेदरलँड्सवर 95 धावांनी मात
INDW vs NEDW Womens T20 WC Live UpdatesImage Credit source: ICC X ACCOUNT

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना होता.भारतीय संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह सलग दुसरा सामना जिंकला. भारताने नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर नेदरलँड्सला 120 चेंडूही खेळता आले नाहीत. भारताने नेदरलँड्सला 114 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. तर नेदरलँड्सचा हा सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 17 Jun 2026 10:24 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाचा विजय, नेदरलँड्सवर 95 धावांनी मात

    वुमन्स टीम इंडियाने नेदरलँड्सवर 95 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने नेदरलँड्सला 17.3 ओव्हरमध्ये 114 रन्सवर ऑलआऊट केलं. भारतासाठी श्री चरणी हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. भारताचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला.

  • 17 Jun 2026 10:18 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला एका ओव्हरमध्ये 3 झटके, टीम इंडिया विजयाच्या दिशेने

    श्री चरणी हीने नेदरलँड्सला एका ओव्हरमध्ये 3 झटके दिले आहेत. श्री चरणी हीने फ्रेडरिक ओव्हरडीक आणि मिर्थ व्हॅन डेन राड या दोघींना सलग आऊट केलं. त्यानंतर श्रीने आयरिस झविलिंग हीला आऊट केलं. नेदरलँड्सने अशाप्रकारे एकूण 8 विकेट्स गमावल्या आहेत.

  • 17 Jun 2026 10:09 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सचं शतक पूर्ण, टीम इंडिया सहाव्या विकेटच्या शोधात

    नेदरलँड्सने टीम इंडिया विरुद्ध 15 व्या ओव्हरदरम्यान 100 धावा पूर्ण केल्या आहेत. नेदरलँड्सने 15 ओव्हरपर्यंत 5 विकेट्स गमावून 105 धावा केल्या आहेत. भारताने नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 17 Jun 2026 09:41 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला दुसरा झटका, फेबे मोल्केनबोअर आऊट

    भारताने नेदरलँड्सला दुसरा धक्का दिला आहे. फेबे मोल्केनबोअर आऊट झाली आहे. दीप्ती शर्मा हीने फेबे मोल्केनबोअर हीला जेमिमाह रॉडिग्स हीच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 17 Jun 2026 09:25 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : श्रेयांका पाटीलला दुखापत, स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्याची वेळ

    टीम इंडियाची युवा गोलंदाज श्रेयांका पाटील हीला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं आहे. श्रेयांका नेदरलँड्च्या डावातील सहावी ओव्हर टाकत होती. श्रेयांकाने पहिला बॉल टाकला. त्यानंतर बॉल अडवण्याच्या प्रयत्नात श्रेयांकाचा पाय मुरगळला. त्यामुळे श्रेयांका जागेवरच पडली. त्यामुळे काही वेळ खेळ थांबवण्यात आला.  फिजिओ मैदानात आले. श्रेयांकाची पाहणी केली. त्यानंतर श्रेयांकाला छोट्या गाडीच्या मदतीने स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं.

  • 17 Jun 2026 09:13 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सला पहिला झटका, एच सीगर्स आऊट

    टीम इंडियाने नेदरलँड्सला पहिला झटका दिला आहे. नंदीनी शर्मा हीने एच सीगर्स हीला उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्या हाती कॅच आऊट केलं. सीगर्सने 16 बॉलमध्ये 21 रन्स केल्या.

  • 17 Jun 2026 09:09 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सची अप्रतिम सुरुवात, टीम इंडिया विकेटच्या शोधात

    नेदरलँड्सच्या सलामी जोडीने टीमल अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आहे. हेदर सीजर्स आणि फेबे मोल्केनबोअर  या दोघींनी 4 ओव्हरमध्ये बिनबाद 30 धावा जोडल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.

  • 17 Jun 2026 08:56 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : नेदरलँड्सच्या बॅटिंगला सुरुवात, 210 धावांचं आव्हान

    नेदरलँड्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. भारताने नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नेदरलँड्सकडून हेदर सीजर्स आणि फेबे मोल्केनबोअर ही सलामी जोडी मैदानात आली आहे. आता या दोघी टीमला कशी सुरुवात मिळवून देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 17 Jun 2026 08:43 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाचं द्विशतक, नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान

    टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. भारतासाठी शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. स्मृतीने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर शफालीने 55 धावांचं योगदान दिलं.

  • 17 Jun 2026 08:27 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : यास्तिका भाटीया आऊट, टीम इंडियाला चौथा झटका

    नेदरलँडसने जोरदार कमबॅक केलं आहे. नेदरलँड्सने भारताला झटपट 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे. नेदरलँड्सने यास्तिका भाटीया हीला आऊट करत भारताला चौथा झटका दिला आहे. यास्तिकाने 3 धावा केल्या.

  • 17 Jun 2026 08:21 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला तिसरा झटका, जेमीमाह रॉड्रिग्स आऊट

    नेदरलँड्सने भारताला तिसरा झटका दिला आहे. जेमिमाह रॉड्रिग्स आऊट झाली आहे. जेमिमाहने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.

  • 17 Jun 2026 08:20 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला मोठा झटका, स्मृती मंधाना आऊट

    नेदलँड्सने भारताला दुसरा मोठा झटका दिला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना आऊट झाली आहे. स्मृतीने 47 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 11 फोर आणि 1 सिक्स लगावला.

  • 17 Jun 2026 08:09 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : शफालीनंतर उपकर्णधार स्मृती मंधानाचं अर्धशतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत

    शफाली वर्मा हीच्यानंतर ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीचं हे या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं आहे. स्मृतीने पाकिस्तान विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.

  • 17 Jun 2026 07:58 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला पहिला झटका, शफाली वर्मा आऊट

    नेदरलँड्सने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. शफाली वर्मा अर्धशतकानंतर आऊट झाली आहे. शफालीने 38 बॉलमध्ये 10 फोरसह 55 रन्स केल्या. हेदर सीगर्स हीने नेदरलँड्सला पहिलीवहिली विकेट मिळवून दिली.

  • 17 Jun 2026 07:52 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : लेडी सेहवागची फिफ्टी, शफाली वर्माची कडक खेळी

    लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. शफालीने अवघ्या 34 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.  शफालीचं हे वर्ल्डस कप स्पर्धेतील पहिलंच अर्धशतक ठरलं आहे. शफालीने या खेळीत 9 चौकार लगावले.

  • 17 Jun 2026 07:33 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या नावावर पावरप्ले, किती धावा केल्या?

    स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने पावरप्ले आपल्या नावावर केला आहे. या दोघींनी पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 59 धावा केल्या आहेत. शफाली 26 आणि स्मृती 24 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 17 Jun 2026 07:13 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची संयमी सुरुवात, शफाली-स्मृतीच्या किती धावा?

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघींनी 3 ओव्हरमध्ये बिनबाद 26 धावा जोडल्या आहेत. स्मृती 13 आणि शफाली 15 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 17 Jun 2026 07:02 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Score Updates : सामन्याला सुरुवात, भारताची बॅटिंग, शफाली-स्मृती मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला सुरुवात झालीय. नेदरलँड्सने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 17 Jun 2026 06:43 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्स वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन

    नेदरलँड्स वुमन्स टीम प्लेइंग ईलेव्हन : हेदर सीजर्स, फेबे मोल्केनबोअर, बॅबेट डी लीडे (कर्णधार आणि विकेटकीपर), स्टेरे कॅलिस, रॉबिन रिजके, फ्रेडरिक ओव्हरडाइक, आयरिस झविलिंग, मिर्थे व्हॅन डेन रॅड, कॅरोलिन डी लँगे, सिल्व्हर सीजर्स आणि इसाबेल वोनिंग.

  • 17 Jun 2026 06:43 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा.

  • 17 Jun 2026 06:39 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्सने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?

    नेदरलँड्स वुमन्स टीमच्या बाजूने टॉसचा कॉल लागला आहे. नेदरलँड्सने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 17 Jun 2026 06:36 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्स वुमन्स क्रिकेट टीम

    नेदरलँड्स वुमन्स क्रिकेट टीम : बाबेट डी लीडे (कॅप्टन आणि विकेटकीपर), हेदर सीजर्स, फेबे मोल्केनबोअर, स्टेरे कॅलिस, रॉबिन रिजके, सान्या खुराना, फ्रेडरिक ओव्हरडीक, आयरिस झविलिंग, कॅरोलिन डी लँगे, सिल्व्हर सीजर्स, इसाबेल वोनिंग, मिर्थ व्हॅन डेन राड, लारा लीमहुइस, रोझाली लॉरेन्स आणि हन्ना लंधीर.

  • 17 Jun 2026 06:34 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा, यास्तिका भाटिया, रेणुका सिंह ठाकूर, राधा यादव.

  • 17 Jun 2026 06:30 PM (IST)

    INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने

    आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज 17 जून रोजी 10 व्या सामन्यात भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

Published On - Jun 17,2026 6:29 PM

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी