Ind vs NZ, Live 1st Test, Day 3 Score : तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाची 1 बाद 14 धावांपर्यंत मजल, भारताकडे 63 धावांची आघाडी

| Updated on: Nov 28, 2021 | 9:56 AM

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर  न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 129 धावा केल्या आहेत.  57 षटकांमध्ये न्यूझीलंडने हा धावफलक उभारलाय.  

Ind vs NZ, Live 1st Test, Day 3 Score : तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाची 1 बाद 14 धावांपर्यंत मजल, भारताकडे 63 धावांची आघाडी
IND VS NZ

भारतीय संघाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी न गमावता 57 षटकांमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली होती.  मात्र आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यंगने 214 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका किवी फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचदरम्यान, खेळपट्टीला चिकटून बसलेल्या टॉम लॅथम याला अक्षर पटेलने बाद केलं. लॅथमने 282 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. दरम्यान, भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 34 षटकात 62 धावा देत 5 बळी घेतले. त्याला रवी अश्विन 3, उमेश यादव 1 आणि रवींद्र जाडेजाने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 Nov 2021 06:25 PM (IST)

    कल्याण

    अवैध रित्या 71 मुलांना आश्रमात ठेवले प्रकरण..

    आरोपी डॉक्टर केतन सोनीला अटक..

    बाजारपेठ पोलिसांनी अटक करून केले कल्याण कोर्टात हजर..

    डॉक्टरला 30 नोव्हेंम्बर पर्यंत पोलीस कोठडी..

    डॉक्टर केतन सोनी याच्यावर एका मुलाच्या खरेदीचा गुन्हा देखील आहे दाखल…

  • 27 Nov 2021 05:01 PM (IST)

    तिसऱ्या दिवसअखेर भारताची 1 बाद 14 धावांपर्यंत मजल

    तिसऱ्या दिवसअखेर भारताने 1 बाद 14 धावांपर्यंत मजल मारली आहे. मयंक अग्रवाल 4 आणि चेतेश्वर पुजारा 9 धावांवर नाबाद आहेत.

  • 27 Nov 2021 04:29 PM (IST)

    भारताला मोठा धक्का, दुसऱ्याच षटकात शुभमन गिल बाद

    भारताच्या दुसऱ्या डावातील दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला आहे. काईल जेमिसनने शुभमन गिलला (1) त्रिफळाचित केलं. (भारत 2/1)

  • 27 Nov 2021 03:58 PM (IST)

    न्यूझीलंडचा 10 वा फलंदाज माघारी, विल समरविले 6 धावांवर बाद

    न्यूझीलंडने अखेरचा फलंदाज गमावला आहे. रवीचंद्रन अश्विनने विल समरविले याला 6 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 296/10)

  • 27 Nov 2021 03:42 PM (IST)

    न्यूझीलंडचा 9 वा गडी माघारी, काईल जेमिसन 23 धावांवर बाद

    न्यूझीलंडने 9 वी विकेट गमावली आहे. रवीचंद्रन अश्विनने काईल जेमिसनला 23 धावांवर असताना अक्षर पटेलकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 284/9)

  • 27 Nov 2021 03:16 PM (IST)

    न्यूझीलंडला 8 वा धक्का, टिम साऊथी 5 धावांवर बाद

    न्यूझीलंडने 8 वी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने टिम साऊथी याला याला त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 270/8)

  • 27 Nov 2021 03:10 PM (IST)

    न्यूझीलंडचा सातवा गडी माघारी, टॉम ब्लंडेल 13 धावांवर बाद

    न्यूझीलंडने सातवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने टॉम ब्लंडेल याला 13 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 258/7)

  • 27 Nov 2021 02:05 PM (IST)

    न्यूझीलंडचा सहावा गडी माघारी, रचिन रवींद्र 13 धावांवर बाद

    भारताला सहावं यश मिळालं आहे. रवींद्र जाडेजाने रचिन रवींद्र याला 13 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (न्यूझीलंड 241/6)

  • 27 Nov 2021 01:39 PM (IST)

    न्यूझीलंडला पाचवा धक्का, टॉम लॅथम 95 धावांवर बाद

    न्यूझीलंडने पाचवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एस. भरतने शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या टॉम लॅथम (95) याला यष्टीचित केलं. (न्यूझीलंड 227/5)

  • 27 Nov 2021 01:00 PM (IST)

    भारताला चौथं यश, हेन्री निकोलस 2 धावांवर बाद

    भारताला चौथं यश मिळालं आहे. अक्षर पटेलने हेन्री निकोलसला 2 धावांवर असताना पायचित केलं. (न्यूझीलंड 218/4)

  • 27 Nov 2021 12:50 PM (IST)

    न्यूझीलंडला तिसरा धक्का, रॉस टेलर 11 धावांवर बाद

    न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली आहे. अक्षर पटेलने रॉस टेलरला 11 धावांवर असताना एस. भरतकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलं 214/3)

  • 27 Nov 2021 12:31 PM (IST)

    न्यूझीलंडचं द्विशतक, टॉम लॅथम शतकाच्या उंबरठ्यावर

    न्यूझीलंडने 86 षटकांमध्ये दोन गड्यांच्या बदल्यात 200 धावांचा टप्पा पार केला आहे. सलामीवीर टॉम लॅथम (86) शतकाच्या उंबरठ्यावर आहे, तर रॉस टेलर 7 धावांवर खेळत आहे.

  • 27 Nov 2021 11:37 AM (IST)

    भारताला दुसरं यश, कर्णधार केन विलियम्सन 18 धावांवर बाद

    जलदगती गोलंदाज उमेश यादवने भारताला दुसरं यश मिळवून दिलं आहे. उमेशने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला 18 धावांवर असताना पायचित केलं. (न्यूझीलंड 197/2)

  • 27 Nov 2021 10:14 AM (IST)

    न्यूझीलंडला पहिला धक्का, विल यंग 89 धावांवर बाद

    रवीचंद्रन अश्विनने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. त्याने आक्रमक विल यंगला 89 धावांवर असताना झेलबाद केलं. एस. भरतने त्याचा झेल टिपला (न्यूझीलंड 151/1)

  • 27 Nov 2021 09:39 AM (IST)

    न्यूझीलंडचे सलामीवीर मैदानात, तिसरा दिवस कोण गाजवणार?

    न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम नॅथन आणि विल्यम यंग मैदानात दाखल झाले असून  तिसऱ्या दिवशी टीम इंडियांच्या खेळांडूंना यश मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

Published On - Nov 27,2021 9:27 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.