AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया यंदाही कानपूरमध्ये न्यूझीलंडचा बँड वाजवणार? पाहा 45 वर्षांपासूनची आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे ग्रीन पार्कवर भारताचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे.

टीम इंडिया यंदाही कानपूरमध्ये न्यूझीलंडचा बँड वाजवणार? पाहा 45 वर्षांपासूनची आकडेवारी
India vs New Zealand
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे ग्रीन पार्कवर भारताचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. भारताने या मैदानात सर्वच संघांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे, मात्र न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. (India vs New Zealand head to head Test Record in Kanpur)

ग्रीन पार्क येथे भारत आणि न्यूझीलंडमधील संघर्षाचा इतिहास 45 वर्षांचा आहे, आणि या 45 वर्षांत भारताचा विजयाची आकडेवारी 100 टक्के इतकी आहे. या मैदानावर खेळताना न्यूझीलंडच्या हाती काहीच लागलेलं नाही. न्यूझीलंडकडे यंदा इतिहास बदलण्याची संधी आहे. तर भारतासमोर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडचा संघ यावेळी बदललेला आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या संघाने भारताला पराभूत करुन नुकतीच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. तसेच आयसीसी क्रमवारीतदेखील हा संघ पहिल्या नंबरवर आहे. याशिवाय या संघाचे फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि ईश सोढी हेदेखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. विशेष म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर नेहमीच फिरकीपटूंचं वर्चस्व राहीलं आहे. दरम्यान, उभय संघांमध्ये 2016 मध्ये शेवटची कसोटी खेळवण्यात आली होती. त्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

कानपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड

ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. याआधी या मैदानावर दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. ग्रीन पार्क येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 1976 साली खेळवण्यात आला होता, जो अनिर्णित राहिला होता. यानंतर 1999 च्या कसोटीत दोन्ही संघ ग्रीन पार्कवर भिडले. सचिन तेंडूलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने हा सामना 8 विकेटने जिंकला. अनिल कुंबळेने त्या सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 197 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

ग्रीन पार्कची आकडेवारी

ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताने 7 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत, तर 12 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. कानपूरमध्ये टीम इंडियाचा शेवटचा पराभव 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. तेव्हापासून, भारतीय संघाने ग्रीन पार्क येथे 8 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात 5 जिंकले आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

इतर बातम्या

Video: कुत्र्याने अशी विकेटकिपिंग केली की, क्रिकेटचा देवही प्रसन्न झाला, पाहा सचिनने शेअर केलेला अप्रतीम व्हिडीओ!

IND vs NZ: कसोटी मालिकेपूर्वी कोच राहुल द्रविडची रणनीती तयार, ओपनरला मिडल ऑर्डर फलंदाज बनवलं

भारताने दोनदा हातातली ICC Trophy गमावली; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींची खंत

(India vs New Zealand head to head Test Record in Kanpur)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.