AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, सामना केव्हा? जाणून घ्या

India vs Pakistan Womens T20i World Cup 2026 : क्रिकेट चाहत्यांना टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. जाणून घ्या.

IND vs PAK : टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, सामना केव्हा? जाणून घ्या
India vs Pakistan Cricket FansImage Credit source: Scott Barbour/Getty Images
| Updated on: Feb 24, 2026 | 4:27 PM
Share

यजमान आणि गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात रविवारी 15 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा आठवा विजय ठरला. टीम इंडियाने त्यानंतर नेदरलँड्सवर मात करत साखळी फेरीत अजिंक्य राहण्यासह विजयी चौकार लगावला. तसेच पाकिस्ताननेही टीम इंडिया विरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता साखळी फेरीतील इतर 3 सामने जिंकले. मात्र भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांची सुपर 8 मध्ये खराब सुरुवात झाली.  पाकिस्तानचा सुपर 8 मधील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. तर टीम इंडिया आपल्या सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दोन्ही संघांचं उपांत्य फेरीचं समीकरण अवघड झालं आहे. अशात क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असल्याचं समोर आलं आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

आयसीसीने मंगळवारी 24 फेब्रुवारीला आगामी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जून 12 ते 5 जुलै दरम्यान एकूण 33 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. इंग्लंडमधील एकूण 6 स्टेडियममध्ये हे सर्व सामने होणार आहेत. या स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी 12 संघांमध्ये चुरस असणार आहे. या 12 संघांना 6-6 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळायचे आहेत.

टीम इंडिया ए ग्रुपमध्ये

टीम इंडियाचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाला मोहिमेतील आपला पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना रविवारी 14 जून रोजी होणार आहे.

टीम इंडिया पाकिस्ताननंतर नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडियाने 2025 मध्ये भारतात हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. अशात आता महिला ब्रिगेड या स्पर्धेत कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, 14 जून
  • भारत विरुद्ध नेदरलँड्स, 17 जून
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 21 जून
  • भारत विरुद्ध बांगलादेश, 25 जून
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 28 जून

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड