India Vs Pakistan : रोहित शर्मानं उकललं playing 11चं गूढ, पाकिस्तानही गोंधळात, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल? जाणून घ्या…

भारत-पाकिस्तान सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन कोणत्या 11 खेळाडूंना संधी देणार हे जाणून घेण्याची भारतीय चाहत्यांना उत्सुकता आहे . रोहित शर्मानं यासंदर्भात काही महत्वाची माहिती दिली आहे. 

India Vs Pakistan : रोहित शर्मानं उकललं playing 11चं गूढ, पाकिस्तानही गोंधळात, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल? जाणून घ्या...
रोहित शर्माImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 9:53 PM

नवी दिल्ली : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ती चर्चा म्हणजे एका बहुप्रतिक्षित सामन्याची प्रतीक्षा आहे. आशिया चषकातील (Asia Cup 2022) भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना उद्या होणार आहे. या सामन्याला काहीच तास उरले आहेत. मात्र, याआधीच या सामन्याविषयी चर्चा रंगली आहे. संघात कुणाला संधी मिळणार, कोणत्या फलंदाजाचा समावेश करण्यात आला, कुणाला संधी मिळाली, कुणाला वगळलं, अशा प्रकारच्या या चर्चा आहेत. यातच टीम इंडियाच्या (Team India) कर्णधारानं प्लेइंग इलेव्हनसंदर्भात एक गूढ उकललं आहे. आशिया चषकचा (Asia Cup 2022) सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये होणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन कोणत्या 11 खेळाडूंना संधी देणार हे जाणून घेण्याची भारतीय चाहत्यांना उत्सुकता आहे . रोहित शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबतची परिस्थिती स्पष्ट करेल आणि प्ले-11 बाबत काही संकेत देईल, अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही.

कुणाची निराशा, कुणाला आशा

रोहितने पत्रकार परिषद घेतली पण प्लेइंग-11 बद्दल काहीही सांगितले नाही, मात्र अद्यापपर्यंत संघ व्यवस्थापनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले. 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडतील. पाकिस्तानही रोहित प्लेइंग-11 बद्दल काय बोलणार याची वाट पाहत होता, पण त्याचीही निराशा झाली. आम्ही तुम्हाला सांगतो की ही मुख्य फेरी आहे आणि त्याआधी पात्रता फेरी होती ज्यामध्ये हाँगकाँगला पराभूत करण्यात यश आले आहे. त्याला भारत आणि पाकिस्तानच्या गटात स्थान मिळाले आहे.

टॉसने काही फरक पडणार नाही

रोहितला प्लेइंग-11 बद्दल विचारले असता तो म्हणाला, आम्ही प्लेइंग-11 बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. उद्याचा सामना त्याच खेळपट्टीवर होईल ज्यावर आजचा (श्रीलंका आणि अफगाणिस्तान) सामना होणार आहे. सामना कसा रंगतो ते पाहावे लागेल. त्याआधारे आम्ही आमच्या प्लेइंग-11बाबत निर्णय घेऊ. मी खेळपट्टीच्या क्युरेटरशी बोललो आहे. टॉसने काही फरक पडत नाही. इथे दव राहणार नाही. पण श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील आजचा सामना कसा जातो ते पाहूया. त्यानंतरच निर्णय घेऊ.

हे सुद्धा वाचा

केएल राहुल दुखापतीमुळे ब्रेकवर होता. झिम्बाब्वे दौऱ्यावरून तो परतला आहे. तो सलामीवीर आहे. राहुल नसताना रोहित वेगवेगळ्या खेळाडूंसोबत ओपनिंग करताना दिसला. दीपक हुडानेही सलामी दिली आणि सूर्यकुमार यादवनेही सलामी दिली. रोहितला जेव्हा विचारण्यात आले की, केएल राहुल आल्यानंतर त्यालाच ओपनिंग मिळेल की कर्णधारासोबत आणखी कोणी दिसेल? याचीही चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.