IND vs SA: अन्यथा टीम इंडियाचा घात होईल, ‘या’ विभागात कामगिरी सुधारावीच लागेल

IND vs SA: अन्यथा टीम इंडियाचा घात होईल, 'या' विभागात कामगिरी सुधारावीच लागेल
भारतीय कसोटी संघ

सांघिक कामगिरीने मिळवलेला विजय संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावतो. मायदेशात झालेल्या पराभवामुळे खवळलेला दक्षिण आफ्रिकन संघ सुद्धा तितक्याचं निकाराने झुंज देईल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 03, 2022 | 7:00 AM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनमधील कसोटी विजयामुळे भारतीय संघ सध्या उत्साहात आहे. आजपासून जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचा भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. 29 वर्षात भारतीय संघाला जे शक्य झालं नाही, ते मालिका विजयाचं स्वप्न साकार करण्याच्या इराद्याने टीम इंडिया वाँडर्सच्या मैदानावर खेळणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी सामना जिंकला ही चांगली बाब आहे. पण म्हणून बेसावध होऊन अजिबात चालणार नाही. (India vs South Africa Johannesburg New Wanderers Stadium Team india need improvement in batting dept)

ते फक्त कागदी शेर ठरले होते

पहिल्या कसोटी विजयात भारतीय संघाने सर्वच विभागात चांगली कामगिरी केलीय असं नाहीय. फलंदाजी हे भारताचं बलस्थान आहे. पण उपकर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालचा अपवाद वगळता अन्य फलंदाज फक्त कागदी शेर ठरले आहेत. यात कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे प्रमुख फलंदाज आहेत. पहिल्या डावात पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यामुळे भारताचा पुढचा मार्ग सुकर झाला होता. पण दुसऱ्यादिवशी व त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते.

तिघांची दोन्ही डावात सुमार कामगिरी

विराट कोहलीने दोन्ही डावात मिळून 52, अजिंक्य राहणेने 68 आणि चेतेश्वर पुजाराने फक्त 16 धावा केल्या होत्या. आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने दोन्ही डावात मिळून 42 धावा केल्या होत्या. रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर हे उपयुक्त फलंदाजी करु शकतात. पण वेळेला ते सुद्धा फार काही करु शकले नाहीत. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फक्त 54 धावांची भर घालून भारताचे सात फलंदाज तंबूत परतले होते.

आफ्रिकन संघ सुद्धा तितक्याचं निकाराने झुंज देईल

दुसऱ्या डावातही तीच स्थिती होती. भारताला 175 धावाही करता आल्या नव्हत्या. पहिल्या डावातील आघाडी आणि गोलंदाजची जोरदार कामगिरी यामुळे भारताला पहिली कसोटी जिंकता आली होती. तेच राहुल आणि मयांक पहिल्या डावात चालले नसते, तर भारताची काय अवस्था झाली असती?. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटीत विराट, अजिंक्य, पुजारा, पंत यांना जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. अन्यथा प्रत्येकवेळी फक्त गोलंदाजांवर अवलंबून चालणार नाही. एखाद-दुसऱ्या फलंदाजाने नव्हे, तर सांघिक कामगिरीने मिळवलेला विजय संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावतो. मायदेशात झालेल्या पराभवामुळे खवळलेला दक्षिण आफ्रिकन संघ सुद्धा तितक्याचं निकाराने झुंज देईल. त्यामुळे भारताला फलंजदाजीत सुधारणा करावीच लागेल. अन्यथा घात होऊ शकतो.

संबंधित बातम्या:

वाह काय टायमिंग! बरोबर अखेरच्या दिवशी जत्रा रद्द, अंधेरीतील मालवणी जत्रा रद्द करण्यामागच्या राजकारणाची बातमी
CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..
Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें