IND Vs ZIM, 1st ODI, Live Score: धवन-गिलचा जबरदस्त खेळ, पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय

India Vs Zimbabwe 1st Match Live Updates: झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ आतापर्यंत 16 सामने खेळला आहे. त्यात फक्त 2 सामन्यात भारताचा पराभव झालाय.

IND Vs ZIM, 1st ODI, Live Score: धवन-गिलचा जबरदस्त खेळ, पहिल्या वनडेत भारताचा दणदणीत विजय
IND vs ZIM
Image Credit source: Twitter

|

Aug 18, 2022 | 6:57 PM

मुंबई: झिम्बाब्वे विरुद्ध भारताने पहिल्या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने 10 विकेट राखून हा सामना जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या सलामीच्या जोडीनेच विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिखर धवनने 113 चेंडूत 81 आणि शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा फटकावल्या. धवनने 9 चौकार मारले. शुभमनने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. दरम्यान पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याने 7 षटकात 27 धावा देऊन सुरुवातीचे 3 विकेट घेतले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 18 Aug 2022 06:38 PM (IST)

  भारताची मालिकेत 1-0 आघाडी

  झिम्बाब्वे विरुद्ध भारताने पहिला वनडे सामना 10 विकेट राखून जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या सलामीच्या जोडीनेच विजयावर शिक्कामोर्तब केलं. शिखर धवनने 113 चेंडूत 81 आणि शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा फटकावल्या. धवनने 9 चौकार मारले. शुभमनने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.

 • 18 Aug 2022 05:46 PM (IST)

  शिखर धवनची हाफ सेंच्युरी

  सलामीवीर शिखर धवनने हाफ सेंच्युरी झळकवली आहे. 19 षटकानंतर भारताच्या बिनबाद 99 धावा झाल्या आहेत. धवनने 76 चेंडूत 50 धावा केल्या. यात 5 चौकार आहेत.

 • 18 Aug 2022 05:04 PM (IST)

  भारताची चांगली सुरुवात

  8 षटकात भारताच्या बिनबाद 37 धावा झाल्या आहेत. शिखर धवन 19 आणि शुभमन गिल 8 धावांवर खेळतोय.

 • 18 Aug 2022 03:59 PM (IST)

  झिम्बाब्वेचा डाव आटोपला

  झिम्बाब्वेचा डाव 189 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून नवव्या विकेटसाठी सर्वाधिक इव्हान्स आणि नगारवा यांनी 70 धावांची भागीदारी केली. इव्हान्स 33 धावांवर नाबाद राहिला. नगारवाने 34 धावा केल्या. भारताकडून कमबॅक करणाऱ्या दीपक चाहरने 3 विकेट घेतल्या. सुरुवातीलाच त्याने झिम्बाब्वेला हादरे दिले. प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल यांनी सुद्धा प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

 • 18 Aug 2022 03:40 PM (IST)

  झिम्बाब्वेची धावसंख्या 150 च्या पुढे

  झिम्बाब्वेच्या 110 धावांवर 8 विकेट होत्या. पण आता 9 व्या विकेटसाठी रिचर्ड नगारवा आणि ब्रॅड इव्हान्सची जोडी जमली आहे. त्यांनी झिम्बाब्वेची धावसंख्या 150 च्या पुढे नेली आहे. इव्हान्स 25 तर नगारवा 22 धावांवर खेळतोय.

 • 18 Aug 2022 03:13 PM (IST)

  झिम्बाब्वेला लागोपाठ दोन धक्के

  29 षटकानंतर झिम्बाब्वेची स्थिती 111/8 आहे. अक्षर पटेलने लागोपाठ दोन धक्के दिले. आधी कॅप्टन चकाबावाला 35 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर ल्युकला 13 धावांवर पायचीत पकडलं.

 • 18 Aug 2022 02:39 PM (IST)

  झिम्बाब्वेची सहावी विकेट

  झिम्बाब्वेची सहावी विकेट गेली आहे. रायन बर्लला प्रसिद्ध कृष्णाने 11 धावांवर मिडविकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केलं. 21 षटकानंतर झिम्बाब्वेची स्थिती 87/6 आहे.

 • 18 Aug 2022 02:02 PM (IST)

  झिम्बाब्वेचे अर्धशतक पूर्ण

  13 षटकानंतर झिम्बाब्वेची स्थिती 52/4 आहे. सिकंदर रझा आणि कॅप्टन चकाबवाची जोडी मैदानात आहे.

 • 18 Aug 2022 01:45 PM (IST)

  झिम्बाब्वेच्या 4 विकेट

  झिम्बाब्वेची चौथी विकेट गेली आहे. वेसली माधवीरला 5 धावांवर पायचीत पकडलं. दीपक चाहरचा हा तिसरा विकेट आहे.

 • 18 Aug 2022 01:42 PM (IST)

  झिम्बाब्वेला तिसरा झटका, मोहम्मद सिराजने काढली विकेट

  झिम्बाब्वेची तिसरी विकेट गेली आहे. मोहम्मद सिराजने अनुभवी सीन विलियम्सला स्लीप मध्ये शिखर धवनकरवी झेलबाद केलं. अवघ्या 1 रन्सवर तो आऊट झाला. 10 ओव्हर्सच्या पहिल्या पावरप्ले मध्ये झिम्बाबेची स्थिती 31/3 अशी आहे.

 • 18 Aug 2022 01:32 PM (IST)

  IND vs ZIM: दीपक चाहरने झिम्बाब्वेला दिला दुसरा झटका

  दीपक चाहरने झिम्बाब्वेला दुसरा झटका दिला आहे. ताडिवानाशे मारुमानी 8 धावांवर आऊट झाला. चाहरने त्याला सॅमसनकरवी झेलबाद केलं. 8.1 षटकात झिम्बाब्वेची स्थिती 26/2 आहे.

 • 18 Aug 2022 01:25 PM (IST)

  IND vs ZIM: झिम्बाब्वेला पहिला झटका

  इनोसेंट कायाच्या रुपाने झिम्बाब्वेला पहिला झटका बसला आहे. दीपक चाहरने संजू सॅमसनकरवी कायाला 4 धावांवर झेलबाद केलं. 6.4 षटकात झिम्बाब्वेच्या 25/1 अशी स्थिती आहे.

 • 18 Aug 2022 01:21 PM (IST)

  IND vs ZIM: झिम्बाब्वेची सावध सुरुवात

  6 षटकात झिम्बाब्वेच्या बिनबाद 25 धावा झाल्या आहेत. ताडिवानाशे मारुमानी आणि इनोसेंट ही सलामीची जोडी मैदानात आहे. ताडिवानाशे 8 आणि इनोसेंट 4 धावांवर खेळतोय.

 • 18 Aug 2022 12:59 PM (IST)

  IND vs ZIM: भारत-झिम्बाब्वे सामन्याला सुरुवात

  भारत आणि झिम्बाब्वे मध्ये पहिला वनडे सामना सुरु झाला आहे. दोन षटकात झिम्बाब्वेच्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत. दीपक चाहरने पहिली ओव्हर टाकली. दुसरी ओव्हर मोहम्मद सिराजने टाकली. झिम्बाब्वेकडून ताडिवानाशे मारुमानी आणि इनोसेंट ही सलामीची जोडी मैदानात उतरली आहे.

 • 18 Aug 2022 12:32 PM (IST)

  IND vs ZIM: भारताची प्लेइंग इलेवन

  भारताची प्लेइंग इलेवन – शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज

 • 18 Aug 2022 12:31 PM (IST)

  IND vs ZIM: भारताने टॉस जिंकला

  भारताचा कॅप्टन केएल राहुलने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

 • 18 Aug 2022 12:30 PM (IST)

  आकडे काय सांगतात?

  झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ आतापर्यंत 16 सामने खेळला आहे. त्यात फक्त 2 सामन्यात भारताचा पराभव झालाय.

Published On - Aug 18,2022 12:29 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें