AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, बांगलादेशला पराभूत करत काढला वचपा

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशने भारताला पराभूत केलं होतं. आता बांगलादेशला साखळी फेरीत पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने टीम इंडियाला फायदा झाला आहे.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, बांगलादेशला पराभूत करत काढला वचपा
| Updated on: Jan 20, 2024 | 9:43 PM
Share

मुंबई : अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशला 84 धावांनी पराभूत करत नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा करून घेतला आहे. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. त्यांनी गोलंदाजी स्वीकारत भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. सुरुवातीला दोन गडी झटपट बाद झाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली होती. आदर्श सिंग आणि उदय सहारन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी केली. दोघांनी 116 धावांनी पार्टनरशिप करत बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम काढला. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. बांगलादेशसमोर विजयासाठी 7 गडी गमवून 251 धावांचं आव्हान दिलं होतं. पण बांगलादेशचा संपूर्ण संघ 167 धावांवर बाद झाला.

भारताचा डाव

भारताकडून आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 17 धावा असताना अर्शिन अवघ्या 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला मुशीर खानही काही खास करू शकला नाही. 3 धावा करून तंबूत परतला. मग आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी डाव सावरला. 116 धावांची भागीदारी केली. आदर्श सिंग 76 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सहारन 64 धावांवर असताना बाद झालाय. मधल्या फळीतली प्रियांशु मोलियाने 23, अरवेली अवनिश रॉयने 23, तर मुरुगन पेरुमल अभिषेकने 4 धावा करून बाद झाले. सचिन दास नाबाद 26 आणि राज लिम्बानी नाबाद 2 धावांवर राहिले. बांगलादेशकडून मरुफ म्रिधाने सर्वाधिक 5 गडी बाद केले. तर चौधरी मोहम्मद रिझवान आणि महफुझुर रहमानने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

बांगलादेशचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अरिफुल इस्लाम आमि मोहम्मद शिहाब जेम्स वगळता एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. मोहम्मद जेम्सने 54 धावांची खेळी केली. तर भारताकडून सौमी कुमार पांडेने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मुशीर खानने 2, राज लिम्बानीने 1, आर्शिन कुलकर्णीने 1 आणि प्रियांशु मोलियाने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, महफुजुर रहमान रब्बी (कर्णधार), शेख पावेझ जिबोन, मो. इक्बाल हुसेन एमोन, मारुफ मृधा, रोहनत डौल्ला बोरसन

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.