IND-W vs ENG-W : इंग्लंड विरुद्ध पराभवानंतरही स्मृतीचं अर्धशतक ‘हिट’, अनेक विक्रम केले नावावर

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या टी-20 मध्ये पराभव झाला. मात्र भारताकडून सलामीवीर स्मृती मंधानाने ठोकलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर तिने काही खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.

IND-W vs ENG-W : इंग्लंड विरुद्ध पराभवानंतरही स्मृतीचं अर्धशतक 'हिट', अनेक विक्रम केले नावावर
स्मृती मंधाना
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 7:31 PM

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाला (India Women Cricket Team)  इंग्लंडच्या दौैऱ्यातील (England Tour) शेवटच्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका भारत जिंकेल असे वाटत असतानाच अखेरचा सामना 8 विकेट्सने गमावल्यावर ही मालिकाही 2-1 ने भारताच्या हातातून निसटली. पण या सामन्यात भारताची सलामीवीर आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने दमदार 70 धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील 13 वे आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासोबतच तिने काही खास विक्रमही आपल्या नावे केले.

स्मृतीने 51 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकत 70 धावा केल्या. तिच्या या अर्धशतकी खेळीसह ती भारतीय क्रिकेट महिला संघातून परदेशात सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारी खेळाडू ठरली. तिची परदेशी भूमितील ही सातवी 50 प्लस खेळी होती. यासोबतच मंधानाह सर्वाधिक टी-20 अर्धशतकं ठोकणारी डावखुरी महिला फलंदाज ठरली आहे. तिने ठोकलेले हे अर्धशतक तिच्या कारकिर्दीतील 13 वे टी-20 अर्धशतक होते. तिने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला मागे टाकलं आहे. मूनीच्या नावावर 12 अर्धशतकं आहेत. तर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानची बिस्माह मारूफ असून तिच्या नावावर 11 अर्धशतकं आहेत.

असा झाला सामना

प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मती मंधानाच्या 70 धावांच्या जोरावरच  इंग्लंडसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. कारण स्मृती सोडता कर्णधार हरमनप्रीत कौर (36) आणि रिचा घोष (20) यांच्याशिवायत कोणत्या फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र इंग्लंडकडून सलामीवीर डॅनी वायटने (Danni Wyatt) 89 धावांची तुफानी खेळी खेळत 19 व्या ओव्हरमध्येच संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या गोलंदाजीचा विचार करता दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवला. ज्यामुळे इंग्लंडने 8 विकेट्सनी दमदार विजय आपल्या नावे केला.

स्मृतिचं अर्धशतक तर डॅनीचंही चोख प्रतित्यूत्तर

हे ही वाचा :

IND-W vs ENG-W: भारतीय संघावर ‘ही’ इंग्लंडची खेळाडू पडली भारी, दमदार फलंदाजी करत खेचून आणला विजय, सामन्यासह मालिकेतही भारताचा पराभव

ऋषभ पंतला कोरोना, आता विराट कोहलीचा हुकमी एक्का इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार?

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

(Indian Batter Smriti Mandhana broke Records with her Fifty Against England in 3rd T20)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.