IND v ENG: वर्षभरानंतर भारतीय संघात मिळेल संधी, ‘या’ गोलंदाजाच्या पुनरागमनाने इंग्लंडचा संघ अडचणीत

या धुरंदर खेळाडेने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 48 कसोटी सामन्यांचा अनुभव असणाऱ्या या खेळाडूने केवळ एकच सामना इंग्लंडमध्ये खेळला आहे.

IND v ENG: वर्षभरानंतर भारतीय संघात मिळेल संधी, 'या' गोलंदाजाच्या पुनरागमनाने इंग्लंडचा संघ अडचणीत
भारतीय कसोटी संघ
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 12:18 PM

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वातील पहिलीच कसोटी मालिका असलेल्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना  पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला होता. आता आज (12 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता दुसरा सामना सुरु होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल होण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान आपल्या स्पीडसाठी प्रसिद्ध असलेला एक धुरंदर भारतीय गोलंदाजाला यावेळी संधी मिळून शकते. उमेश यादव (Umesh Yadav) असं त्याच नाव असून तो जवळपास वर्षभरानंतर कसोटी सामना खेळेल.

पहिल्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेणाऱ्या शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्याने त्याला लॉर्ड्समधील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. पण पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 4 वेगवान गोलंदाज खेळवत चांगली कामगिरी केली होती. त्यानुसारच दुसऱ्या सामन्यातही जर शार्दूल नसताना भारतीय संघ 4 वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतो तर उमेश यादवची जागा पक्की होऊ शकते. उमेशच्या गोलंदाजीत स्पीड आहे, इतर भारतीय गोलंदाजाच्या तुलनेत त्याची ही जमेची बाजू असल्याने त्याला लॉर्ड्सच्या मैदानात मदत होईल. ज्यामुळे त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्ध उमेश यादव

उमेश यादवने डिसेंबर, 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्द शेवटचा कसोटी सामना भारतीय संघातून खेळला होता. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दुखापतींमुळे संघाबाहेर असणाऱ्या यादवला आजच्या सामन्यात पुन्हा संधी मिळू शकते. त्याने भारतीय संघातून 48 कसोटी सामने खेळले आहे. ज्यातील एक सामना इंग्लंडमध्ये खेळला आहे. ज्यात त्याने 3 विकेट्स घेतले होते. 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावेळी त्याने हा सामना खेळला होता. तर आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध त्याने 7 कसोटी सामने खेळले असून त्यात 15 विकेट्स घेतले आहेत.

हे ही वाचा

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

(Indian Fast Bowler Umesh Yadav may include in Team indias final 11 for india vs england second test)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.