IPL 2021 : पहिल्यांदा ‘हृदय’ दिलं, आता म्हणते, ‘नवी सुटकेस घे’, पृथ्वी-प्राचीच्या नात्याची एकच चर्चा!

IPL 2021 : पहिल्यांदा 'हृदय' दिलं, आता म्हणते, 'नवी सुटकेस घे', पृथ्वी-प्राचीच्या नात्याची एकच चर्चा!
पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग...

जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना 'हृदय' देते. (Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Advice him Buy A new Suitcase)

Akshay Adhav

|

Apr 30, 2021 | 3:11 PM

मुंबई : दिल्लीचा युवा बॅट्समन ज्याच्या बॅटच्या जादूने कोलकात्याच्या संघाचे डोळे दिपले जे त्यांनी शेवटपर्यंत उघडलेच नाहीत… दिल्लीच्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने कोलकात्याविरुद्ध (Dc vs KKR) धमाकेदार खेळी केली. त्याने फक्त 41 बॉलमध्ये तडाखेबाज 82 रन्स केले. तो कोलकात्याच्या बोलर्सवर अक्षरश: तुटून पडला होता. त्याने तब्बल 200 च्या स्ट्राईक रेटने कोलकात्याच्या बोलर्सची पिसे काढली. त्याची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या हृदयात कायम घर करुन राहिल यात शंका नाही. पण केवळ क्रिकेट रसिकांच्याच हृदयात नव्हे तर त्याच्या ‘दिलाची धडकन’ प्राची सिंगला (Prachi Singh) देखील पृथ्वीची ही विशेष खेळी भावली. पृथ्वीच्या या बहारदार खेळीनंतर तिने आता पृथ्वीला एक नवी सुटकेस घेण्याचा सल्ला दिला आहे. (IPL 2021 Dc vs KKR Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Advice him Buy A new Suitcase)

पृथ्वीच्या 41 बॉलमध्ये धडाकेबाज 82 धावा, कोलकात्याला पळता भुई थोडी

पृथ्वीने कोलकात्याविरुद्ध फक्त 41 बॉलमध्ये धडाकेबाज 82 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीला त्याने 11 चौकार आणि 3 षटकारांचा साज चढवला. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने कोलकात्याच्या बोलर्सला धुतलं. त्याने डावाच्या पहिल्याच ओव्हर्समध्ये शिवम मावीला सलग 6 चौकार सीमापार धाडून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याने कोलकात्याच्या सगळ्याच बोलर्सला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला.

नवी सुटकेस खरेदी कर, प्राचीचा खास सल्ला

पृथ्वी शॉने खेळलेल्या झंझावाती खेळीने त्याची चर्चित गर्लफ्रेंड प्राची सिंगचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला पृथ्वीच्या बॅटचा तडाखा एवढा आवडला की तिने पृथ्वीची बक्षीसं ठेवण्यासाठी त्याला नवी सुटकेस घेण्याचा सल्ला दिला. सामना संपल्यानंतर प्राचीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने पृथ्वीचे फोटो शेअर करत त्याच्यावर हर्ट दिलं आणि आता तू एक नवी सुटकेस खरेदी कर, जिच्यात ही सगळी बक्षीसं बसतील, असा खास सल्ला प्राचीने पृथ्वीला दिला.

prachi singh Instagram Story

तू एक नवी सुटकेस खरेदी कर, जिच्यात तुला मिळालेली सगळी बक्षीसं बसतील, असा खास सल्ला प्राचीने पृथ्वीला दिला आहे.

पृथ्वी-प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना ‘हृदय’ देते.

चेन्नईविरुद्ध पृथ्वीची बॅट बोलली होती, तेव्हाही प्राचीने रोमँटिक पोस्ट लिहिली होती…!

पृथ्वीच्या चेन्नईविरोधातील खेळीने त्याची गर्लफ्रेंड प्राची सिंग भलतीच खूश झाली. पृथ्वीने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. प्राचीने इन्स्टग्राम पोस्ट करत पृथ्वीची तारीफ केली. पृथ्वीने काय शानदार सुरुवात केली…. असं म्हणत तिने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. याअगोदरही प्राचीने पृथ्वीच्या बॅटिंग परफॉरमन्सवर आपली मतं मांडली आहेत.

IPL 2021 Dc vs KKR Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Advice him Buy A new Suitcase

हे ही वाचा :

IPL 2021 : स्टेडियममध्ये बसलेली ही मुलगी कोण?, जिच्यासमोर षटकार मारताच राहुल चहर रागाने लालबुंद झाला!

IPL 2021 : चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने पत्नीला किस केलं, जहीर खानच्या बायकोने फोटो ट्विट केला अन्….

IPL 2021 : सलग 6 बॉलवर 6 चौकार खाल्ल्यानंतर शिवम मावीने दाबला पृथ्वी शॉ चा गळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें