तुफानी फलंदाजी आणि घातक गोलंदाजी, कोलकात्याचा हुकमी एक्क्याने IPL गाजवली, हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला!

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सिक्सर किंग हार्दिक पंड्या फिटनेसच्या समस्येला तोंड देत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याने बोलिंग केलेली नाही. तसंच बॅटिंगमध्येही त्याचा विशेष परफॉर्मन्स दिसेनासा झाला आहे.

तुफानी फलंदाजी आणि घातक गोलंदाजी, कोलकात्याचा हुकमी एक्क्याने IPL गाजवली, हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला!
हार्दिक पांड्या आणि व्यंकटेश अय्यर

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सिक्सर किंग हार्दिक पांड्या सध्या फिटनेसच्या समस्येला तोंड देत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याने बोलिंग केलेली नाही. तसंच बॅटिंगमध्येही त्याचा विशेष परफॉर्मन्स दिसेनासा झाला आहे. त्याचमुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या जागी एका अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याचा विचार करु शकते. आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एक खेळाडू खूप चर्चेत आलाय. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सलामीवीर व्यंकटेश अय्यरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. झंझावाती फलंदाज व्यंकटेश अय्यर टिच्चून गोलंदाजी करण्यातही माहिर आहे.

तुफानी फलंदाजी आणि घातक गोलंदाजी, कोलकात्याचा हुकमी एक्का

व्यंकटेश अय्यरने आयपीएल 2021 च्या 10 सामन्यांत 128.47 च्या स्ट्राईक रेटने 370 धावा केल्या असून त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी -20 मध्ये मोठा विक्रम आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण टी -20 क्रिकेटच्या 48 सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7 आणि 24 लिस्ट ए सामन्यांमध्ये 10 विकेट घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने त्याच्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की तो हार्दिक पंड्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

केकेआरचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

बायो-बबलमध्ये असूनही जेव्हा अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तेव्हा बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, केकेआरची टीम सातव्या स्थानावर होती. पण इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघाने यूएईमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आणि अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज कडून 27 धावांनी पराभव कोलकात्याला पराभव स्वीकारावा लागला.

व्यंकटेश अय्यरची महत्त्वाची भूमिका

कोलकाता नाईट रायडर्स ने आयपीएल 2021 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला. कोलकाताच्या या उत्कृष्ट कामगिरीमध्ये 27 वर्षीय सलामीवीर व्यंकटेश अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने यूएई लीगमध्ये पदार्पण करताना आपली छाप पाडली.

(IPL 2021 hardik Pandya Option team india venkatesh iyer)

हे ही वाचा :

IPL 2021: चालत्या बसमध्ये ब्राव्होचा धमाल डान्स, शार्दूलच्या बर्थ-डे पार्टीत धोनीची मस्ती, ऑस्ट्रेलियापासून ते वेस्ट इंडिजपर्यंत CSK ची हवा

कोलकात्याचा पराभवाबरोबर धुरंदर खेळाडूच्या करिअरला ब्रेक?, पुन्हा खेळण्यावरही प्रश्नचिन्ह!

MS Dhoni : बायको अन् मुलीला मिठी मारली, रैनाच्या फॅमिलीसोबत फोटोसेशन केलं, धोनीच्या विजयी सेलिब्रेशनचे खास फोटो!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI