AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही झालं तरी विराटला IPL ट्रॉफी जिंकवून द्यायचीच, RCB खेळाडू करतायत जीवाचं रान, प्लॅन ठरला!

IPL चा यंदाचा हंगाम (IPL 2021) RCB कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा हंगाम आहे. यूएईमध्ये लीगचा दुसरा हंगाम सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने यंदाच्या वर्षानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर केले होते.

काहीही झालं तरी विराटला IPL ट्रॉफी जिंकवून द्यायचीच, RCB खेळाडू करतायत जीवाचं रान, प्लॅन ठरला!
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 1:49 PM
Share

दुबई : IPL चा यंदाचा हंगाम (IPL 2021) RCB कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा हंगाम आहे. यूएईमध्ये लीगचा दुसरा हंगाम सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने यंदाच्या वर्षानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्याने हे देखील स्पष्ट केले होते की जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो फक्त आरसीबीकडून खेळेल.

विराट कोहली बरीच वर्षे आरसीबीचा कर्णधार आहे. आतापर्यंत आरसीबीचा संघ कधीही विजेतेपद मिळवू शकला नाही. गेल्या दोन हंगामात आयरीबी संघ चांगला खेळला पण जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला. आरसीबीच्या खेळाडूंना आता या स्टार कर्णधाराला विजयासह निरोप द्यायचा आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात विजयी षटकार मारणारा के एस भरतने यासंबंधीचा खुलासा केलाय.

विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा, त्यासाठी काहीही करण्याची तयारी

संपूर्ण टीमला विराट कोहलीसाठी जेतेपदाची ट्रॉफी उंचवायचीय. याबद्दल बोलताना यष्टीरक्षक फलंदाज भरत म्हणाला, ‘अर्थातच आम्हाला विराट भाईसाठी यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची इच्छा आहे. यंदा जर आम्ही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झालो तर याच्याहून चांगली काहीच नसेल. या विजयासाठी संपूर्ण टीम जीवतोड मेहनत करत आहे. पण खरं सांगायचं तर विराटसोबत खेळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो तरुण खेळाडूंवर प्रेम करतो आणि त्यांना प्रेरणा देतो. तो खूप मेहनत करतो. तो खूप व्यावसायिक आहे आणि त्याच्याबरोबर खेळणे मला आत्मविश्वास देते. तो खूप प्रोफेशनल आहे, तो नेहमी आम्हाला मदत करण्यास तयार असतो.

कोणत्याही क्रमाने फलंदाजी करण्यास तयार

भरत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळत राहिला पण संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले की फलंदाजीची क्रमवारी कधीही बदलली जाऊ शकते. त्यावर त्याला प्रश्न विचारला असता, तो म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. याबद्दल मी संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितलं आहे. प्रत्येकजण आव्हानासाठी सज्ज आहे. मला असं वाटत नाही की आमच्या संवादामध्ये कोणतीही कमी आहे. जेव्हा तुम्हाला संधी दिली जाते, तेव्हा तुम्हाला चांगली कामगिरी करून संघाला विजयाकडे नेण्याची इच्छा असते.

गेल्या दोन-तीन वर्षांत त्याच्या फलंदाजीच्या शैलीत झालेल्या बदलाबद्दल बोलताना भरत म्हणाला की, या वेळी मला जाणवलं की तो प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे आपण धाडू शकत नाही. ‘मी माझी ताकद आणि कमतरता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी 2018-19 (होम सीझन) मध्ये प्रत्येक चेंडू मारण्याच्या उद्देशाने खेळायचो पण नंतर मी माझी एकूण रणनीती सुधारली.

(IPL 2021 Virat Kohli RCB title will cherry on Cake Says KS Bharat)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नई की दिल्ली, फायनलमध्ये पहिल्यांदा कोण एन्ट्री करणार? या 5 खेळाडूंच्या हातात सामन्याचा निकाल!

उम्रान मलिक T20 Worldcup मध्ये भारतीय संघासोबत, IPL 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकल्याबद्दल मिळाली संधी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.