AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: इंग्लिश क्रिकेटपटूंवर विश्वास कसा ठेवायचा? शेवटच्या क्षणी दिला धोका

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेला (IPL) आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र त्याआधी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीने चांगलच हैराण केलं आहे.

IPL 2022: इंग्लिश क्रिकेटपटूंवर विश्वास कसा ठेवायचा? शेवटच्या क्षणी दिला धोका
IPL 2022 Schedule: 12 double header matches can be played this seasonImage Credit source: BCCI TWITTER
| Updated on: Mar 13, 2022 | 6:35 PM
Share

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेला (IPL) आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. मात्र त्याआधी काही संघांना खेळाडूंच्या दुखापतीने चांगलच हैराण केलं आहे. अनेक प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा परिणाम थेट टीमच्या प्लानिंगवर होत आहे. ऐनवेळी बाहेर पडणाऱ्या खेळाडूच्या तोडीचा दुसरा प्लेयर कसा आणायचा? हा सर्व फ्रेंचायजींसमोर मुख्य प्रश्न आहे. खासकरुन इंग्लंडच्या क्रिकेटपटूंमुळे आयपीएल फ्रेंचायजींना जास्त धक्का बसला आहे. जेसन रॉय (Jason Roy) नंतर शुक्रवारी अ‍ॅलेक्स हेल्सने माघार घेतली. तो कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणार होता. जेसन रॉयला गुजरात टायन्सने विकत घेतलं होतं. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला जोफ्रा आर्चरसारखी कोपराची दुखापत झाली आहे.

हेल्स आणि रॉय प्रमाणे वुडही दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेऊ शकतो. त्याला लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 7.5 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. मागच्यावर्षी सुद्धा अनेक इंग्लिश क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली होती.

इमर्जन्सी, दुखापत आम्ही समजू शकतो

“जेव्हा एखादा खेळाडू उपलब्ध असतो. तेव्हा फ्रेंचायजी काही प्लान्स बनवतात. इमर्जन्सी असेल किंवा दुखापत आम्ही समजू शकतो. पण काही बाबतीत असं नाहीय. भविष्यात इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना विकत घेण्याआधी फ्रेंचायजी नक्कीच विचार करतील” असं फ्रेंचायजीने इनसाइस स्पोटर्सला सांगितलं.

फ्रेंचायजी नाराज

इंग्लिश खेळाडूंच्या माघारीमुळे मोठा अडथळा येत नाहीय. पण फ्रेंचायजी त्यांच्या वर्तनावर नाराज आहेत. रॉय आणि हेल्सने बायोबबलचं कारण दिलं आहे. हे खेळाडू आता जे कारण देऊन बाहेर होतायत, त्यावर फ्रेंचायजी आणि माजी खेळाडूंकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यांना नियम वैगेरे आधी माहित नव्हतं का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

पराभव माघारीचं मुख्य कारण

Ashes मालिकेतील पराभव हे सुद्धा इंग्लिश खेळाड़ूंच्या माघारीचे एक कारण आहे. मागच्या महिन्यात Ashes मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता. त्यावेळी मायदेशात इंग्लिश क्रिकेटपटूंवर बरीच टीका झाली होती. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी खराब कामगिरीसाठी आयपीएलला जबाबदार धरलं होतं.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.