IPL 2022 KKR vs GT Live Streaming: जाणून घ्या कोलकाता विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत (IPL 2022) शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. या दिवशी चाहत्यांना एका दिवसात दोन थ्रिलर सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. 23 एप्रिल रोजी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

IPL 2022 KKR vs GT Live Streaming: जाणून घ्या कोलकाता विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Gujarat titansImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:00 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत (IPL 2022) शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. या दिवशी चाहत्यांना एका दिवसात दोन थ्रिलर सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. 23 एप्रिल रोजी पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. केकेआरने मागील दोन सामने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि सनरायझर्स हैदराबादकडून गमावले आहेत. याउलट लीगमधील अव्वल संघ गुजरात टायटन्सने मागील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादकडून मोसमातील पहिला पराभव मिळाला, त्यानंतर या संघाने आधी राजस्थान रॉयल्स आणि नंतर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होता. या सामन्यात डेव्हिड मिलरने 94 धावांची खेळी खेळली आणि राशिद खान (40 धावा) सोबत महत्त्वाची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. या संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच जिंकले असून गुणतालिकेत हा संघ अव्वल स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 23 एप्रिल (शनिवार) रोजी खेळवला जाणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद

MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO

IPL 2022: CSK ला आणखी एक मोठा झटका, दीपक चाहर पाठोपाठ आणखी एक गोलंदाज बाहेर, नव्या ‘मलिंगा’चा संघात समावेश

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.