Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RCB : दोन किंग एकत्र होते, पण बाजी मारली ShahRukh Khan ने, एकदा VIDEO बघा, म्हणजे समजेल

KKR vs RCB IPL 2023 : डोन्ट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ शाहरुख खान. बॉलिवूडच्या किंग खानची सर्वसामान्यांध्ये किती क्रेझ आहे, खासकरुन कोलकात्यामध्ये ते या व्हिडिओमधून समजेल.

KKR vs RCB : दोन किंग एकत्र होते, पण बाजी मारली ShahRukh Khan ने, एकदा VIDEO बघा, म्हणजे समजेल
shahrukh-KhanImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:01 AM

KKR vs RCB IPL 2023 : इडन गार्डन्सवर काल कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या KKR ने बाजी मारली. त्यांनी RCB वर थोड्या थोडक्या नव्हे, तब्बल 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 204 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची टीम 123 रन्सवर ऑलआऊट झाली. आयपीएलचा सीजन सुरु झाल्यापासूनचा हा 9 वा सामना होता.

इंडियन प्रीमियर लीगमधील KKR विरुद्ध RCB सामन्याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता शाहरुख खानची उपस्थिती. इडन गार्डन्सवर झालेला हा सामना पहायला खास शाहरुख खान उपस्थित होता. बॉलिवूडच्या किंग खानने आपल्या उपस्थितीने प्रेक्षकांच मन जिंकलं.

चार वर्षानंतर किंग खान स्टेडियममध्ये

आयपीएलमध्ये शाहरुखच्या मालकीची टीम असली, तरी तो स्टेडियममध्ये दिसत नाही. शाहरुख काल तब्बल चार वर्षानंतर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आला होता. इडन गार्डन्सवर शाहरुख खानची क्रेझ दिसून आली. काल स्टेडियममध्ये दोन किंग उपस्थित होते. एक क्रिकेटचा, एक अभिनयाच. क्रिकेटचा किंग म्हणजे विराट कोहली. तो मैदानात मॅच खेळत होता, तर शाहरुख प्रेक्षक गॅलरीत होता.

शाहरुखने मात्र जिंकलं

विराट कोहली कालच्या मॅचमध्ये फार विशेष चमक दाखवू शकला नाही. तो 18 चेंडूत 21 रन्सवर आऊट झाला. विराटच्या बॅटमधून फटक्यांची आतषबाजी अपेक्षित होती. पण विराटने निराश केलं. त्याचवेळी शाहरुखने मात्र जिंकलं. अभिनेता शाहरुख खान आपल्या फॅन्सच मन राखण्यासाठी ओळखला जातो. काल स्टेडियममध्ये तेच दिसून आलं.

खास स्टाइलमध्ये प्रेक्षकांच मनोरंजन

शाहरुखचा मैदानात तोच अवतार दिसून आला. शाहरुख स्टेडियममध्ये आल्याच समजात प्रेक्षकांनी एकच गलका केला. त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टँडमधील प्रेक्षक उठून उभे राहिले. शाहरुखने सुद्धा आपल्या खास स्टाइलमध्ये हात पसरुन प्रेक्षकांच मनोरंजन केलं. मॅच संपल्यानंतर त्याने विराट कोहलीची भेट घेतली. सुपरस्टार म्हटलं जातं, ते उगाच नाही

शाहरुख खानने विराटला त्याच्या पठाण चित्रपटातील काही डान्स स्टेप्स शिकवल्या. यावेळी शाहरुख आणि विराटमध्ये खूपच चांगलं बॉन्डिंग असल्याच दिसून आलं. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला शाहरुखचा पठाण चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. शाहरुख खानला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटलं जातं, ते उगाच नाही, हे काल पुन्हा एकदा दिसून आलं.

ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा.
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?.
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?.
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान.
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले.
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस
संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस.
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख
वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख.
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले.
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार
आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार... लवकरच कोर्स सुरू होणार.
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?
मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय; सरकारला दिलासा की घाम फुटणार?.