AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT : सूर्यकुमारच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईचं गुजरातला ‘इतक्या’ धावांचं आव्हान

MI vs GT : सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या म्हणजे हायस्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. मुंबईकडून सनथ जयसूर्या याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 114 धावा केल्या होत्या.

MI vs GT : सूर्यकुमारच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईचं गुजरातला 'इतक्या' धावांचं आव्हान
| Updated on: May 12, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये पलटणने 20 ओव्हरमध्ये 218-4  धावा केल्या आहेत. गुजरातला जिंकण्यासाठी 219 धावांचां लक्ष्य असणार आहे. वानखेडे मैदानावर आज सूर्याकुमारचं वादळ आलं होतं. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यासोबतच ईशान किशन 30 आणि रोहित शर्माने 29 धावा केल्या. गुजरातच्या राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

मुंबईची  बॅटींग-

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आले होते. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी दमदार सुरूवात केली होती.महत्त्वाचं म्हणजे कर्णधार रोहित शर्माने जुन्या फॉर्ममध्ये परतलेला दिसला.  6 ओव्हरमध्ये दोघांनी 61 धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली  होती. मात्र राशिद खानने सातव्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि ईशानला माघारी पाठवत कमबॅक केलं.

दोघे आऊट झाल्यावर मैदानात सूर्यकुमार आणि नेहल वढेरा यांनी डाव सावरला. पण परत एकदा राशिदने तिसरी विकेट घेत वढेराला आऊट केलं. युवा विष्णू विनोद 30 धावा करत सूर्याला चांगली साथ दिली. सूर्याने शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहत संघाला 200 धावांचा पल्ला ओलांडून दिला. सूर्या 97 धावांवर होता तेव्हा 1 बॉल राहिलेला होता  यावेळी भिडूने सिक्सर मारत आपलं पहिलं शतक ठोकलं.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.